Old and Dangerous Bridges : श्री गणेश मूर्ती आगमन-विसर्जन मार्गावर जुन्या व धोकादायक पुलांचे विघ्न

धोकादायक स्वरुपाच्या पुलांवर ध्वनीक्षेपकाचा वापर करुन नाचगाणी करण्यात येऊ नये.

116
Old and Dangerous Bridges : श्री गणेश मूर्ती आगमन-विसर्जन मार्गावर जुन्या व धोकादायक पुलांचे विघ्न
Old and Dangerous Bridges : श्री गणेश मूर्ती आगमन-विसर्जन मार्गावर जुन्या व धोकादायक पुलांचे विघ्न

मुंबईतील रेल्वे मार्गावरील काही पूल धोकादायक स्वरुपाचे असून काही पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. शिवाय, काही पुलांची कामे पावसाळ्यानंतर सुरु करण्यात येत असल्यामुळे गणेशभक्तांनी श्री गणेशाचे आगमन-विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान या पुलांवरून जाताना काळजी घ्यावी. याबाबत मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलीस यांच्या वतीने वेळोवेळी सूचना करण्यात येत असून या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

करी रोड स्थानकावरील पूल, साने गुरुजी मार्गावर (आर्थर रोड) असणारा चिंचपोकळी रेल्वेस्थानकावरील पूल आणि भायखळा परिसरातील रेल्वे मार्गावरील ‘मंडलिक पूल’ या पुलांवर एकावेळेस १६ टनांपेक्षा अधिक वजन होणार नाही (भाविकांचे व वाहनांचे मिळून एकंदर वजन); याची काळजी घ्यावी. या पुलांवर ध्वनीक्षेपकाचा वापर करुन नाचगाणी करण्यात येऊ नये.

उत्सवाचा आनंद पुलावरुन खाली आल्यावर घ्यावा. पुलावर एका वेळेस भाविकांची जास्त गर्दी न करता, पुलावर जास्त वेळ न थांबता त्वरित पुलावरुन पुढे जावे, पोलीस व मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार मार्गक्रमण करावे. या सर्व सुचनांचे काळजीपूर्वक पालन करावे व गणेशोत्सवातील विसर्जनाचे कामकाज व्यवस्थितरित्या पार पाडण्यास मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिस यांना सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महागरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

(हेही वाचा – I.N.D.I. A. आणि N.D.A. एकाच दिवशी मुंबईत भिडणार)

धोकादायक पुलांची यादी – 

मध्य रेल्वे –

१) घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रिज.
२) करी रोड रेल्वे ओव्हर ब्रिज.
३) आर्थर रोड रेल्वे ओव्हर ब्रिज किंवा चिंचपोकळी रेल्वे ओव्हर ब्रिज.
४) भायखळा रेल्वे ओव्हर ब्रिज.

पश्चिम रेल्वे –

१) मरीन लाईन्स रेल्वे ओव्हर ब्रिज.
२) सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)
३) फ्रेंच रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)
४) केनडी रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)
५) फॉकलन्ड रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये)
६) बेलासिस, मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ.
७) महालक्ष्मी स्टील रेल्वे ओव्हर ब्रिज.
८) प्रभादेवी–कॅरोल रेल्वे ओव्हर ब्रिज.
९) दादर येथील लोकमान्य टिळक रेल्वे ओव्हर ब्रिज.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.