Sangli Crime News: ५०० रुपयांच्या बनावट नोटा खात्यात भरल्या, सांगली शहर पोलिसांकडून तिघे ताब्यात

149
Sangli Crime News: ५०० रुपयांच्या बनावट नोटा खात्यात भरल्या, सांगली शहर पोलिसांकडून तिघे ताब्यात
Sangli Crime News: ५०० रुपयांच्या बनावट नोटा खात्यात भरल्या, सांगली शहर पोलिसांकडून तिघे ताब्यात

सांगली शहरातील (Sangli Crime News) राजवाडा चौक येथे असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या शाखेतील पैसे भरण्याच्या मशीनमध्ये तिघा संशयितांनी एका बंद खात्यावर ५०० रुपयांच्या १९ बनावट नोटा भरल्याचे उघडकीस आले आहे.

सांगली शहरातील राजवाडा चौक येथे आयसीआयसीआय बँकेची मुख्य शाखा आहे. या ठिकाणी पैसे भरण्याचे मशीन ठेवण्यात आले आहे. यादरम्यान १४ नोव्हेंबरला दुपारी बँकेचे खातेदार सतीश सुखदेव पाटील हे २ अज्ञात व्यक्तिंसोबत बँकेत आले. त्यांनी त्यांच्या साथीदारांसह संगनमत करून त्यांच्या बँक खात्यावर ५०० रुपयांच्या १९ चलनी बनावट नोटा (Fake Note)  असल्याचे माहित असूनदेखील त्या खऱ्या आहे, असे भासवून वापरात आणण्याच्या उद्देशाने मशीनमध्ये भरल्या.

(हेही वाचा – Payment Gateway Scam : पेमेंट गेटवे घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा)

या प्रकरणी बँकेचे नोडल ऑफिसर खराडे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बनावट नोटा भरणाऱ्या सतीश सुखदेव पाटील आणि दोन अनोळखी व्यक्तिंवर गुन्हा दाखल केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.