अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी चोरीचा प्रयत्न; दोघांना अटक

103
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी चोरीचा प्रयत्न; दोघांना अटक
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी चोरीचा प्रयत्न; दोघांना अटक

सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या ‘किनारा’ बंगल्यात गेल्या आठवड्यात चोरीचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात जुहू पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. या दोघांनी खिडकीतून बंगल्यात प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र बंगल्याच्या आतून सजावटीचे काम सुरू असल्यामुळे चोरट्याच्या हाती काहीही लागले नव्हते. अर्जुन बाबू देवेंद्र आणि अजय उर्फ रमेश आरमोगम देवेंद्र उर्फ अजय चित्ता असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे विलेपार्ले येथील नेहरू नगर झोपडपट्टी येथे राहणारे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती जुहू पोलिसांनी दिली आहे.

शिल्पा शेट्टी यांच्या जुहू येथील ‘किनारा’ बंगल्यात २५ मे पासून आतून सजावटीचे व दुरुस्तीचे काम सुरू आहे. यादरम्यान शिल्पा कुटुंबासह परदेशात गेलेली असून तिच्या पश्च्यात बंगल्याची देखरेख शैलेश चौधरी पाहत होता. ६ जून रोजी सकाळी चौधरी हा झोपेतून उठला असता त्याला शिल्पा शेट्टी आणि तिच्या मुलीच्या खोलीतील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आले होते. दरम्यान चौधरीने बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक इसम तोंडाला मास्क लावून खिडीकीच्या वाटे शिल्पाच्या मुलीच्या बेडरूममध्ये शिरल्याचे दिसून आले. चोरीचा प्रकार समोर येताच चौधरीने तात्काळ जुहू पोलिसांना कळवले. जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला असता घरातील वस्तू अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आले असले तरी चोरी करणाऱ्याच्या हाती काहीही लागले नव्हते.

(हेही वाचा – धावत्या ट्रेनमध्ये विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न, CSMT स्थानकाजवळील धक्कादायक घटना)

पोलिसांनी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन अज्ञात व्यक्ती विरुद्ध घरफोडीच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. जुहू पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेऊन खबरीच्या मदतीने अर्जुन बाबू देवेंद्र आणि अजय उर्फ रमेश आरमोगम देवेंद्र उर्फ अजय चित्ता या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी जुहू पोलिसांनी या दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले दोघे सराईत चोर असून त्यांच्यावर पश्चिम उपनगरात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.