Mumbai Crime : काळबादेवी अंगाडीया कार्यालयावर दरोडा, ५५ लाखांची रोकड लुटली

या दरोड्याच्या घटनेमुळे परिसरातील व्यवसायिक आणि व्यापऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

204
Mumbai Crime : काळबादेवी अंगाडीया कार्यालयावर दरोडा, ५५ लाखांची रोकड लुटली
Mumbai Crime : काळबादेवी अंगाडीया कार्यालयावर दरोडा, ५५ लाखांची रोकड लुटली

काळबादेवी येथे एका अंगाडीयाच्या कार्यालयावर दरोडा टाकून ५५ लाख रुपयांची रोकड लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली आहे. (Mumbai Crime)

शस्त्र घेऊन आलेल्या चार अनोळखी दरोडेखोरांनी हा दरोडा टाकल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली असून याप्रकरणी लो. टी. मार्ग पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दरोड्याच्या घटनेमुळे परिसरातील व्यवसायिक आणि व्यापऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Mumbai Crime)

(हेही वाचा – Share Market: सेन्सेक्सने उच्चांक गाठला, कोणते शेअर्स वधारले; वाचा सविस्तर…)

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी एका अंगडीया व्यावसायिकाच्या कार्यालयात चार अनोळखी लोकांनी घुसून तेथे उपस्थित असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून ओलीस ठेवले होते. त्यानंतर या दरोडेखोरांनी कार्यालयात असलेली ५५ लाख रुपयांची रोकड लुटून पोबारा केला. (Mumbai Crime)

सोमवारी सकाळी या घटनेची माहिती लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांना देण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करत अनोळखी दरोडेखोरांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Mumbai Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.