Share Market: सेन्सेक्सने उच्चांक गाठला, कोणते शेअर्स वधारले; वाचा सविस्तर…

186
Share Market: सेन्सेक्सने उच्चांक गाठला, कोणते शेअर्स वधारले; वाचा सविस्तर...
Share Market: सेन्सेक्सने उच्चांक गाठला, कोणते शेअर्स वधारले; वाचा सविस्तर...

देशांतर्गत शेअर बाजाराच्या (Share Market) सुरुवातीला सेन्सेक्सने जोरदार उसळी घेतली. सुरुवातील निफ्टी लाल चिन्हात दिसत होता, मात्र त्यानंतर त्याच्यात वाढ दिसली. सेन्सेक्सने प्रथमच ७० हजारांची पातळी ओलांडली असून बाजाराला नव्या शिखरावर नेले आहे. क्रूडच्या किमती पुन्हा स्थिर झाल्या आहेत आणि ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल ७६ डॉलरच्या वर आहेत. बँक निफ्टीने जवळपास ३०० अंकांच्या वाढीसह सुरुवात केली आहे.

आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात करताना बीएसई सेन्सेक्सने १०० अंकांच्या म्हणजेच ०.१४ टक्क्यांच्या वाढीसह ६९,९२५वर उघडला. एनएसईचा निफ्टी ०४.१० अंकांच्या नाममात्र घसरणीसह २०,९६५ वर उघडला.

बँक निफ्टीमध्ये वाढ
बँक निफ्टीने सुमारे ३०० अंकांच्या वाढीसह सुरुवात करून ४७,४८७.६०पर्यंत उच्चांक गाठला. सोमवारी बाजाराला बँक निफ्टीकडून जोरदार पाठिंबा मिळत आहे, कारण सर्व शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत.

कोणते शेअर्स वधारले?
इंडसइंड बँक १.४७ टक्क्यांनी आणि एचसीएल टेक १.१९ टक्क्यांनी वधारत आहे. अल्ट्राटेक सिमेंट ०.८१ टक्के आणि कोटक महिंद्रा बँक ०.६७ टक्क्यांनी वधारले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.