Video Call वर खासगी संवाद साधणे पडले महागात; इन्फ्लुएन्सरकडे मागितली १५ लाखांची खंडणी

67
Video Call वर खासगी संवाद साधणे पडले महागात; इन्फ्लुएन्सरकडे मागितली १५ लाखांची खंडणी
Video Call वर खासगी संवाद साधणे पडले महागात; इन्फ्लुएन्सरकडे मागितली १५ लाखांची खंडणी

व्हिडीओ कॉलवरील (Video call) खासगी संवादाचे चित्रीकरण करून, तो न्यूड व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल करण्याची धमकी देत १५ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान (IT) कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार तरुण व्यवसायाने कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर असून, गेल्या दोन वर्षांपासून इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर (Instagram influencer) म्हणूनही सक्रिय आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी त्याची एका महिलेशी ओळख झाली होती. या दोघांमध्ये नियमितपणे व्हिडीओ कॉलवर संवाद होत असे. याच दरम्यान त्यांच्यातील खासगी संवादाचे नकळत न्यूड चित्रिकरण करण्यात आल्याचा आरोप आहे.

(हेही वाचा – AIR INDIA: टेवोल्डे ग्रेबेमारियम एअर इंडियाचे नवे सीईओ, महत्त्वपूर्ण टप्प्यावर नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबाबत म्हणाले…)

१४ मे रोजी काही संशयित व्यक्तींनी तक्रारदाराची भेट घेऊन, संबंधित महिलेकडे त्याचा न्यूड व्हिडीओ असल्याची माहिती दिली. हा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित न करण्याच्या बदल्यात त्याच्याकडे १५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. मात्र, तक्रारदाराने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला.

तक्रारदाराने खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर, काही दिवसांनी त्याच्या एका मित्राने इन्स्टाग्रामवरील एका अकाऊंटवर तो न्यूड व्हिडीओ अपलोड झाल्याचे त्याला कळवले. पाठोपाठ त्याच्या बहिणीनेही तोच व्हिडीओ पाहिल्याचे सांगत व्हॉट्सॲपवर (WhatsApp) त्याची लिंक पाठवली.

‘exposingtruth60’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ प्रसारित करून आपली जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी संबंधित महिला आणि तिच्या साथीदारांनी संगनमताने कट रचल्याचा संशय असून, डोंगरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील कसून तपास सुरू केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.