Police Officer Transfer : मुंबई पाठोपाठ ठाण्याचे पोलीस आयुक्त, एटीएसला पोलीस महासंचालकाचा दर्जा

राज्यातील २५ आयपीएस अधिकारी यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

44

मुंबई पोलीस आयुक्त पाठोपाठ ठाणे पोलीस आयुक्त आणि राज्य दहशतवाद विरोधी पथक प्रमुखपदाला पोलीस महासंचालकाचा दर्जा देण्यात आला आहे. ठाणे पोलीस दलाचे विद्यमान आयुक्त जयजीत सिंग, एटीएस प्रमुख सदानंद दाते आणि बिपीन कुमार सिंह यांना पोलीस महासंचालक पदी पदोन्नती देण्यात आली आहे. या तीन जेष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांसह राज्यातील २५ आयपीएस अधिकारी यांना पदोन्नती Police Officer Transfer देण्यात आली आहे.

मुंबई पोलीस आयुक्तपदाला पोलिस महासंचालक पद प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने ठाणे पोलीस आयुक्त तसेच राज्य दहशतवाद विरोधी पथक प्रमुखपद पोलीस महासंचालक दर्जाचे करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने तसा आदेश सोमवारी जारी केला असून या ठाणे आयुक्त, एटीएस प्रमुख आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अप्पर पोलीस महासंचालक पदावर असणारे जेष्ठ आयपीएस अधिकारी जयजीत सिंग, सदानंद दाते आणि बिपीन कुमार सिंह यांना पोलीस महासंचालक पदी Police Officer Transfer पदोन्नती देण्यात आली आहे. त्याच बरोबर मुंबईसह राज्यातील १२ पोलीस उपमहानिरीक्षक यांना विशेष पोलीस महानिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे, त्यात मुंबईतील पाच अधिकारी यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक दर्जाचे १० अधिकारी पोलीस उपमहानिरीक्षक पदावर बढती देऊन त्यांच्या विविध ठिकाणी बदली करण्यात आली असून त्यात मुंबईतील ३ आयपीएस अधिकारी यांचा समावेश असून त्यांची मुंबईतच बदली करण्यात आली आहे.

(हेही वाचा माजी सनदी अधिकारी लीना मेहेंदळे यांनी लहानग्यांसाठी आणला पुस्तकरूपी खजिना)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.