Online Betting: आयपीएलवर ऑनलाइन सट्टेबाजी; मुंबई गुन्हे शाखेने तरुणाला पकडले रंगेहाथ

123
Online Betting: आयपीएलवर ऑनलाइन सट्टेबाजी; मुंबई गुन्हे शाखेने तरुणाला पकडले रंगेहाथ
Online Betting: आयपीएलवर ऑनलाइन सट्टेबाजी; मुंबई गुन्हे शाखेने तरुणाला पकडले रंगेहाथ
Online Betting : आयपीएल सामन्यावर ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने शनिवारी १९ एप्रिलला रात्री अटक केली. आरोपीचे नाव माणिकचंद कृपाशंकर मौर्य असे आहे. तो राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळल्या जाणाऱ्या आयपीएल सामन्यावर सट्टा लावत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखेच्या क्राइम ब्रांच युनिट ११ ला माणिकचंद मौर्य नावाचा आरोपी आयपीएल सामन्यादरम्यान सट्टेबाजीत सहभागी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे, पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि घटनास्थळी पोहोचून आरोपीला रंगेहाथ पकडले. तो सट्टेबाजीसाठी (Betting) वेबसाइटचा वापर करत होता.

(हेही वाचा – मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वीतेसाठी शासन कटीबद्ध; CM Devendra Fadnavis यांची घोषणा)

दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून सट्टेबाजीसाठी वापरलेला मोबाईल फोन जप्त केला आहे. त्याच्या मोबाईलची तपासणी करताना, अनेक स्क्रीनशॉट सापडले  आहेत. ज्यामध्ये तो सट्टेबाजीमध्ये सक्रियपणे सहभागी होता. हे स्पष्ट झाले आहे. तसेच चौकशीदरम्यान, माणिक चंदने अधिकाऱ्यांसमोर कबूल केले की त्याला देव सिंग नावाच्या दुसऱ्या व्यक्तीकडून वेबसाइटचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळाला होता. 

तसेच मुंबई गुन्हे शाखेला असा संशय आहे की, या प्रकरणात एका व्यक्तीचा समावेश नसून, अनेक ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या लोकांचा समावेश या रॅकेटमध्ये असू शकतो. देव सिंग कोण आहे आणि या नेटवर्कशी आणखी कोण जोडलेले आहेत. हे शोधण्याचा प्रयत्न गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत. यासोबतच, सट्टेबाजीसाठी इतर कोणत्या वेबसाइट्स आणि अॅप्सचा वापर केला जात आहे, याचीही चौकशी केली जात आहे.

(हेही वाचा – Supreme Court ने राष्ट्रपतींना दिलेल्या ‘त्या’ निर्णयावर राजकीय स्तरावर टीकाटिपण्णी; ‘तर संसद बंद…’)

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सांगितले की, या अटकेमुळे त्यांना एका मोठ्या ऑनलाइन बेटिंग सिंडिकेटचे संकेत मिळाले आहेत. तसेच येत्या काळात या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होऊ शकतो. आयपीएलसारख्या (IPL) मोठ्या स्पर्धांमध्ये अशा प्रकारच्या कारवाया अगदी सामान्य झाल्या आहेत, ज्यावर पोलीस सतत लक्ष ठेवत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.