Nirav Modi : पीएनबी बँक घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी नीरव मोदी(Nirav Modi) याचा भाऊ निहाल मोदीला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. फरार आरोपी नीरव मोदी(Nirav Modi)चा धाकटा भाऊ निहाल मोदीवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात अमेरिकेच्या न्याय विभागाने अटकेची पुष्टी केली आहे. त्यानंतर आता निहाल मोदीला भारताला प्रत्यार्पित केले जाणार आहे.(Nirav Modi)
(हेही वाचा ‘यूएस डंकी रूट’ मानवी तस्करी प्रकरणात आणखी दोघांना ‘NIA’ कडून अटक; ‘हिमाचल प्रदेश, दिल्ली येथील…’ )
दरम्यान, सक्तवसुली संचालनालय(ईडी) व सीबीआयच्या विनंतीनंतर निहाल मोदीला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. भारतीय तपास यंत्रणांच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवर फरार हिरे व्यापारी नीरव मोदी(Nirav Modi)चा धाकटा भाऊ निहाल मोदीला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, निहालवर न्यूयॉर्कमध्ये २.६ दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
(हेही वाचा ऑपरेशन सिंदूरमध्ये गेमचेंजर ठरलेली ‘Akash Missile System’; पंतप्रधान मोदींच्या ब्राझील दौऱ्याला विशेष महत्त्व )
निहाल मोदीवर पुरावे नष्ट करण्याचा व नीरव मोदीला बेकायदेशीर कामांत जाणूनबुजून मदत केल्याचा आरोप ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, पीएनबी घोटाळा उघडकीस आल्यानंतर, निहालने नीरव(Nirav Modi)चा जवळचा सहकारी मिहिर आर भन्साळीसोबत दुबईतून ५० किलो सोने व मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बाहेर काढली होती.
१३,००० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप
निहाल मोदीला १७ जुलैला न्यायालयात हजर केले जाईल. निहाल मोदीकडून न्यायालयात जामीन मागितला जाऊ शकतो. परंतु, अमेरिकन अधिकारी न्यायालयात जामिनास विरोध करतील. निहाल मोदीवर पंजाब नॅशनल बँकेशी संबंधित १३,००० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे. हा घोटाळा नीरव(Nirav Modi), निहाल आणि त्याचा काका मेहुल चोक्सी यांनी रचला होता.(Nirav Modi)
Join Our WhatsApp Community


