Crime : १५ कोटी रुपयांच्या कोकेनसह परदेशातील २ जणांना एनसीबीकडून अटक

अटक करण्यात आलेला आरोपी मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबला होता.

51
Crime : १५ कोटी रुपयांच्या कोकेनसह परदेशातील २ जणांना एनसीबीकडून अटक
Crime : १५ कोटी रुपयांच्या कोकेनसह परदेशातील २ जणांना एनसीबीकडून अटक

मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने मोठी कारवाई केली. मुंबईतील एका हॉटेलमधून सुमारे १५ कोटींचे २ किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे तसेच झांबियाच्या नागरिकासह टांझानियन महिलेला (Crime) अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एनसीबीच्या (Narcotics Control Bureau) अधिकाऱ्याने दिली आहे.

या घटनेबाबत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, जप्त करण्यात आलेले २ किलो कोकेन १५ कोटी रुपयांचे आहे. अटक करण्यात आलेला आरोपी मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबला होता. गुप्त माहितीच्या आधारे एनसीबीच्या मुंबई टीमने हॉटेलवर छापा टाकून झांबियाच्या नागरिकाला अटक केली. आरोपी झांबियातील लुसाका येथून इथिओपियाच्या राजधानीत ड्रग्ज घेऊन गेला होता. त्यानंतर तो मुंबईत आला. त्याची चौकशी केली असता आरोपीने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तस्करीबाबत महत्त्वाची माहिती दिली.

(हेही वाचा – Jammu Kashmir Diwali : तब्बल 75 वर्षांनी मंदिरात साजरी झाली दिवाळी )

यावर अधिकाऱ्याने सांगितले की, त्याला एका हँडलरकडून सूचना मिळत होत्या, त्यानंतर त्याच्या हँडलरबद्दल माहिती करून एनसीबीच्या पथकाने दिल्लीला जाऊन टांझानियन महिलेला अटक केली. (Tanzanian woman arrested)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.