Nagpur Crime : लग्नमंडपात खऱ्या नवऱ्याची एंट्री अन् ‘लुटेरी दुल्हन’चा खेळ खल्लास; नागपुरातील धक्कादायक प्रकार

आरोपी महिलेला न्यायालयाने तिला दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून इतर साथीदारांचा शोध सुरू आहे

81
Nagpur Looteri Dulhan Case
Nagpur Looteri Dulhan Case

Nagpur Crime : लग्नाच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करणाऱ्या महिलेचा नागपुरात नाट्यमयरितीने पर्दाफाश झाला. सीताबर्डी परिसरातील एका मंदिरात लग्नाची तयारी सुरू होती, वर-वधुसह सर्व वराती लग्नघटिकेची प्रतिक्षा करत होते, मात्र तेवढ्यात एका व्यक्तीने आचानक मंडपात प्रवेश केला, आणि “ही माझी पत्नी आहे,” असे मोठ्याने ओरडला. हा धक्का सर्वांसाठीच इतका मोठा होती की, अगदी काही क्षणांतच लग्नसोहळा पूर्णपणे गोंधळात बदलला. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ सत्याची तपासणी केली आणि लग्नाच्या नावाखाली तरुणांना लुटणाऱ्या त्या ‘लुटेरी दुल्हन’चा पर्दाफाश केला.

नेमके प्रकरण काय? 

राणी उर्फ कोमल पांडे असे या ‘लुटेरी दुल्हन’चे खरे नाव असून, इतर साथीदारांच्या मदतीने तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून लुटण्याचे काम ही टोळी गेल्या काही काळापासून करत होती. अशातच गुजरातमधील आकाश जिंदल पारेख हा तरूण त्यांच्या गळाला लागला.

विवाहासाठी इच्छुक असलेला आकाश हा वधूच्या शोधात होता. याच दरम्यान त्याचा संपर्क राणी पांडे हिच्याशी झाला. तिने स्वतःला नम्रता मालवीयची बहीण म्हणून ओळख करून दिली आणि नम्रताचे फोटो दाखवत लग्नाची बोलणी पुढे नेली. (Nagpur Crime)

त्यानंतर आकाशला नागपुरातील कोराडी परिसरातील एका घरात नेण्यात आले. तिथे नम्रताशी त्याची भेट घडवून आणण्यात आली. लग्न निश्चित झाल्यानंतर लग्नाच्या खर्चाच्या नावाखाली त्याच्याकडून ७० हजार रुपये रोख तसेच सोन्या-चांदीचे दागिने घेण्यात आले.

हेही वाचा: Ahilyanagar Chikki : चिक्कीचे पॅकेट उघडताच बसला धक्का; हातावर आल्या जिवंत अळ्या, FDA काय कारवाई करणार? 

मंडपातच उघड झाला बनाव

ठरल्याप्रमाणे सीताबर्डीतील मंदिरात लग्नाची तयारी करण्यात आली. वधू-वर मंडपात पोहोचले आणि लग्नविधी सुरू होण्याच्या तयारीत होते. त्याच वेळी एक व्यक्ती अचानक तिथे आला आणि नम्रता ही स्वतःची कायदेशीर पत्नी असल्याचा दावा केला. (Nagpur Crime)

या दाव्यानंतर मंडपात एकच गोंधळ उडाला. संबंधित व्यक्तीकडून माहिती घेतल्यानंतर आकाश पारेख यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री पटली. त्यांनी तातडीने सीताबर्डी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

मुख्य सूत्रधार अटकेत

तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपी राणी उर्फ कोमल पांडे हिला अटक केली. दरम्यान, न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणातील इतर आरोपी आणि मध्यस्थांचा शोध सुरू असून संपूर्ण टोळीचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. (Nagpur Crime)

हेही वाचा: Pandharpur : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजेसाठी ऑनलाइन नोंदणी पुन्हा सुरू होणार; कुठे आणि कसे कराल बुकिंग?

प्राथमिक तपासात राणी पांडे हिचा यापूर्वीही अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे समोर आले आहे. तिच्या अटकेनंतर आणखी काही पीडित पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही संपूर्ण घटना एखाद्या संघटित टोळीमार्फत राबवली जात होती का, या दिशेनेही तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली. (Nagpur Crime)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.