Muslim : मुस्लिम धर्म स्वीकारताच बनला जिहादी; प्रेयसीचं डोकं दगडावर ठेचून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला अटक

जखमी लुबाना ही शुद्धीवर येताच पोलिसांनी तीचा जबाब नोंदवून आकाश मुखर्जी (Love Jihad) यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

153
Muslim : मुस्लिम धर्म स्वीकारताच बनला जिहादी; प्रेयसीचं डोकं दगडावर ठेचून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला अटक

वांद्र्याच्या बँड स्टॅण्ड मधून एक खळबळजनक घटना (Muslim) समोर आली आहे. कल्याण येथून प्रेयसीसोबत मुंबई फिरण्यासाठी आलेल्या तरुणाने प्रेयसीचे डोके दगडावर आपटून तीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना ३१ मे बुधवारी रात्री घडली. या घटनेत तरुणी गंभीररीत्या जखमी झाली असून तीला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुणीची प्रकृती गंभीर असून वांद्रे पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून प्रियकराला अटक केली आहे.

(हेही वाचा – Delhi Sakshi Murder Case : “होय, मीच मारलं”, १६ वर्षीय प्रेयसीला संपवणाऱ्या साहिलची कबुली)

लुबाना जावेद सुकते (२८) असे प्रियकराच्या हल्ल्यात (Muslim) जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. लुबाना ही ठाणे जिल्ह्यातील कल्याण कोनगाव येथे राहणारी आहे. कल्याण खडकपाडा येथे राहणारा आकाश मुखर्जी याच्या सोबत तीचे प्रेमप्रकरण सुरू होते. आकाश ने तिच्या सोबत लग्न करण्यासाठी धर्म बदलून मुस्लिम धर्म स्वीकारला होता.

असा घडला प्रकार :

बुधवारी सकाळी ११वाजता हे दोघे मुंबई फिरण्यासाठी ट्रेनने सीएसएमटी येथे आले होते. मुंबई फिरून झाल्यानंतर दोघे सायंकाळी वांद्रे बँडस्टॅण्ड येथे आले. बँडस्टॅण्ड (Muslim) येथे दगडाच्या आडोशाला बसले होते, काळोख पडून रात्रीचे १० वाजले असता उशीर झाल्यामुळे लुबानाने घरी परत जाण्याचा हट्ट केला,मात्र आकाशने अजून थोडा वेळ बसू त्यानंतर तुला टॅक्सीने घरी सोडतो असे सांगितले. मात्र लुबाना ही घरी जाण्यासाठी रडू लागली असता आकाशने तीला समजावत “मी तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मात (Muslim) परिवर्तन केले आहे, त्याचे प्रमाणपत्र तुझ्या मावशीला दाखवू आणि लग्नासाठी संमती मिळवू, असे तो लुबानाला सांगू लागला. परंतु लुबाना काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे संतप्त झालेल्या आकाशने तोंड दाबून तिचं डोकं दगडावर आपटण्यास सुरुवात केली, रक्तबंबाळ होताच लुबाना बचावासाठी हाका मारु लागली. बँड स्टॅण्डच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा लुबाना ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. लोकांनी चौकशी केली असता आकाशने त्यांना ती दगडावर पडली असं खोटं सांगू लागला. परंतु काही तरी गडबड असल्याचे लोकांच्या लक्षात येताच जमावाने आकाशच्या दिशेने पावलं टाकली. ते पाहताच आकाशने समुद्राच्या दिशेने पळ काढला.जमलेल्या जमावापैकी काही जणांनी आकाशला पकडले व झालेला प्रकार पोलिसांना कळवळा.

हेही पहा – 

 

वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी लुबानाला (Muslim) तात्काळ पोलीस व्हॅन मध्ये बसवून नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून तिचा प्रियकर आकाशला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.

जखमी लुबाना ही शुद्धीवर येताच पोलिसांनी तीचा जबाब नोंदवून आकाश मुखर्जी (Muslim) यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.