Murder : विक्रोळीत राहणाऱ्या सुमनची हत्या; मारेकरी प्रियकर हनान शाहला अटक

121
Murder : विक्रोळीत राहणाऱ्या सुमनची हत्या; मारेकरी प्रियकर हनान शाहला अटक
  • प्रतिनिधी 

लग्न करण्यासाठी तगादा लावणाऱ्या ३७ वर्षीय विवाहित महिलेची गळा कापून हत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे विक्रोळी पूर्व येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी ८ तासांत आरोपीचा शोध घेऊन धारावी परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सुमन सूरज निर्मल (३७) असे हत्या करण्यात आलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. सुमन ही दुसऱ्या पतीसह विक्रोळी पूर्व मच्छी मार्केट येथे राहण्यास होती. सुमनचा पती महालक्ष्मी येथे एका खाजगी कंपनीत सुरक्षा गार्ड म्हणून नोकरी करीत होता. (Murder)

(हेही वाचा – Transfer : बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची बदली; विवेक जॉनसन नवे जिल्हाधिकारी)

सुमन ही धारावी येथे बॅग कारखान्यात काम करीत होती त्याच कारखान्यात काम करणारा हनान शहा (२५) सोबत विवाहबाह्य संबंध होते. मंगळवारी पहाटे रात्रपाळी करून पहाटे घरी आलेला पती सूरज याला सुमन घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली. त्याने तात्काळ विक्रोळी पोलिसांना कळवले, विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सुमनचा मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी येथे पाठविण्यात आला होता. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून हल्लेखोराची माहिती घेण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले. (Murder)

(हेही वाचा – Pahalgam Terrorist Attack : २६ जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 2 नागरिकांचाही मृतांमध्ये समावेश)

दुसरीकडे गुन्हे शाखा कक्ष ७ चे पथक आरोपीचा माग घेत होते. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही, मृत महिला सुमनचे मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड तपासले असता सुमन सोबत काम करणारा हनान शाह संशयित आढळून आला. पोलिसांनी हनान शाह याचा शोध सुरू घेऊन त्याला दुपारी धारावी येथून अटक करण्यात आली आहे. लग्नासाठी सतत तगादा लावत होती म्हणून तिला संपवले अशी कबुली आरोपी हनान याने पोलिसांना दिली. मात्र या हत्येमागे वेगळे कारण असू शकते असा संशय पोलिसांना असून या अनुषंगाने तपास सुरू आहे. (Murder)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.