Mumbai Traffic Police : मुंबई वाहतूक पोलिसांकडून यावर्षी २५० कोटीं रुपयांची विक्रमी दंडाची वसुली 

438
Mumbai Traffic Police : मुंबई वाहतूक पोलिसांकडून यावर्षी २५० कोटीं रुपयांची विक्रमी दंडाची वसुली 
Mumbai Traffic Police : मुंबई वाहतूक पोलिसांकडून यावर्षी २५० कोटीं रुपयांची विक्रमी दंडाची वसुली 
वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून यावर्षी मुंबई वाहतूक विभागाने विक्रमी वसुली केली आहे. मुंबई वाहतूक विभागाने १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत २५० कोटीं दंडाची रक्कम वसूल केली आहे. गेल्यावर्षीच्या दंडाच्या वसुलीच्या (Mumbai Traffic Police) रकमेपेक्षा या वर्षी ४६ कोटींची अधिक वसुली करण्यात आली असल्याचे वाहतूक पोलिसांनी  अधिकृत ‘एक्स’ (जुने ट्विटर) वर माहिती दिली आहे.
मुंबईत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर मुंबई पोलिसांकडून ई-चलनाच्या माध्यमातून दंड आकाराला जातो.वाहतुकीचे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना एकट्या मुंबईत २०१९ पासून १कोटी ३९ लाख ७१हजार६५७ जणांना ई-चलनाच्या माध्यमातून दंड आकारण्यात आलेला आहे. मागील पाच वर्षात ई चलान च्या माध्यमातून आकारण्यात आलेली रक्कमेचा आकडा  ५७९ कोटी ९४ लाख ९८ हजार २९८ रुपयांच्या घरात गेला आहे.

(हेही वाचा-भारत-बांगलादेश सीमेवर रोहिंग्यांची घुसखोरी सुरूच; BSF ने ११२ जणांना केली अटक

ई चलानच्या माध्यमातून वाहन चालकांना आकारण्यात आलेल्या थकीत दंडाची वसुली करण्यासाठी मुंबई वाहतूक विभागा कडून नियमित प्रयत्न केला जातो. थकीत दंडाची रकमेची आकडेवारी मुंबई वाहतुक विभागा कडून वर्षाच्या शेवटी माध्यमापुढे तसेच वाहतूक पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात येते. २ डिसेंबर २०२३ रोजी मुंबई वाहतूक विभागाने २०२३ या सालात वसूल केलेली दंडाची रक्कम आपल्या अधिकृत ‘एक्स’ या खात्यावर प्रसिद्ध केली आहे.
मुंबई वाहतुक विभागाने (Mumbai Traffic Police) यावर्षी १ जानेवारी ते ३० नोव्हेबर २०२३ पर्यंत मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां कडून  २५० कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे जो २०२२ मध्ये वसूल करण्यात आलेल्या दंडापेक्षा ४६ कोटी अधिक आहे असे मुंबई वाहतूक विभागाचे अधिकृत एक्स (जुने ट्विटर)खात्यावर म्हटले आहे. मुंबई वाहतूक विभागाकडून वाहन चालकांना सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे अशी विनंती करण्यात आली आहे.
२०१९ ते ३० नोव्हेबर २०२३पर्यतची दंडाची आकडेवारी खालील प्रमाणे-
◆२०१९ –  १८ लाख १ हजार ११०ई -चलन दंडाची रक्कम ५९ कोटी ७०लाख ९७हजार २५० रुपये
◆२०२० – १३लाख ६४हजार ३२ ई -चलन दंंडाची रक्कम- ४१कोटी ९९लाख ९०हजार ६१९ रुपये
◆२०२१- ३७ लाख ४८हजार ६७२ ई-चलान दंडाची रक्कम- ११२ कोटी ९२ लाख ६८हजार ७५३ रुपये
◆२०२२- ३३ लाख ६८हजार ७६८ ई-चलान दंडाची रक्कम-१५९ कोटी ४७ लाख ६५हजार २०१रुपये
◆२०२३ – ३६ लाख ८९हजार ७५ ई-चलान दंडाची रक्कम-२०५कोटी ८३लाख ७६ हजार ५००रुपये.
मागील पाच वर्षात १कोटी ३९लाख ७१हजार ६५७ वाहन चालकांना ई चलान द्वारे दंड आकारण्यात आलेला असून पाच वर्षांचा दंडाची रक्कम ५७९ कोटी ९४ लाख ९८ हजार २९८ रुपयांच्या घरात गेली आहे.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=0_ctu_EWhMQ&t=98s

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.