साकीनाक्यात भरदिवसा रिक्षात प्रेयसीची गळा चिरून हत्या; प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

139
साकीनाक्यात भरदिवसा रिक्षात प्रेयसीची गळा चिरून हत्या; प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न
साकीनाक्यात भरदिवसा रिक्षात प्रेयसीची गळा चिरून हत्या; प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

साकीनाक्यात विवाहित प्रेयसीची रिक्षातच गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेननंतर पळून गेलेल्या प्रियकराने स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रियकर दीपक बोरसे (३२) हा उल्हासनगर येथे राहणारा असून प्रेयसी ही चांदिवलीच्या संघर्ष नगरात राहण्यास होती. लग्नाच्या वादातून रिक्षातच दोघांमध्ये वाद होऊन या वादातून प्रियकर दीपक याने प्रेयसी पंचशीलाचा गळा चिरून हत्या केल्याची समोर आले आहे. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी प्रियकरा विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

नक्की काय घडले?

पंचशीला अशोक जामदार (३०) असे हत्या करण्यात आलेल्या विवाहितेचे नाव आहे. पंचशीला ही साकीनाका चांदिवली येथील संघर्ष नगरमध्ये राहण्यास होती. तिला दोन मुले असून तिचे पती हे कर्नाटकात असतात. पंचशीला हिचे उल्हासनगर येथे राहणाऱ्या दीपक बोरसे याच्यासोबत मागील काही वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. सोमवारी दीपक हा प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. त्यानंतर दोघे बाहेर गेले होते. दुपारी रिक्षातून घरी परतत असताना पंचशीला आणि दीपक यांच्यात रिक्षातच लग्नावरून वाद झाला. पंचशीला हिने त्याच्यासोबत लग्न करून एकत्र राहण्यास नकार दिल्यामुळे संतापलेल्या दीपक याने पंचशीलाच्या गळ्यावर चाकूने वार करून हत्या केली आणि रिक्षातून बाहेर उडी घेऊन पळून गेला. त्यानंतर काही अंतरावर त्याने स्वतःलाही चाकूने इजा करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती परिमंडळ १०चे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी जखमी प्रियकराला ताब्यात घेऊन त्याला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी प्रियकराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याची माहिती वपोनि गबाजी चिमटे यांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.