Mumbai ATS: बनावट कागदपत्रांसह ४ बांगलादेशींना एटीएसकडून अटक, कशी केली कारवाई? वाचा सविस्तर

दहशतवादविरोधी पथकाच्या जुहू युनिटनं केलेल्या कारवाई प्रकारणी कलम ४६५, ४६८, ४७१, ३४ सहकलम १२ (१६) भारतीय पारपत्र अधिनियम १९६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

151
Mumbai ATS: बनावट कागदपत्रांसह ४ बांगलादेशींना एटीएसकडून अटक, कशी केली कारवाई? वाचा सविस्तर

एटीएसनं मुंबईत मोठी कारवाई करत ४ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. या सर्वांनी बनावट नागरिकत्वाच्या कागदपत्रांच्या आधारे मतदार ओळखपत्रेही मिळवली होती तसेच आरोपींनी लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचे एटीएसने उघड केलं आहे. (Mumbai ATS)

बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिक मुंबईत जास्त प्रमाणात राहत असल्याचं मागील काही महिन्यांपासून दिसून येत आहेत. अशा नागरिकांवर मुंबई पोलीस आणि संबंधित यंत्रणा कारवाई करत आहेत. मंगळवारी मुंबई एटीएसनं बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईत राहणाऱ्या ४ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे तसेच इतर ५ बांगलादेशी नागरिक फरार झाले आहेत. त्यांचा शोध घेत असल्याची माहिती मुंबई एटीएसनं दिली आहे. (Mumbai ATS)

(हेही वाचा – Ratnagiri जिल्ह्यात दरड कोसळली, अनेक गावांचा संपर्क तुटला; नेमकं काय घडलं? जाणून घ्या)

लोकसभा निवडणुकीत केलं मतदान
भारतीय नागरिकांनाच देशातील निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार आहे, मात्र बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांनी बनावट मतदान कार्ड तयार केले आणि लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचं तपासात उघड झालं आहे. त्यामुळे अशा किती बांगलादेशी नागरिकांनी बनावट मतदान कार्ड तयार करून लोकसभा निवडणुकीत मतदान केलं याचा तपास सध्या मुंबई एटीएस करत आहे.

आरोपींची नावे
दहशतवादविरोधी पथकाच्या जुहू युनिटनं केलेल्या कारवाई प्रकारणी कलम ४६५, ४६८, ४७१, ३४ सहकलम १२ (१६) भारतीय पारपत्र अधिनियम १९६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियाज हुसेन शेख (वय ३३), सुलतान सिद्दीकी शेख (वय ५७), इब्राहिम शफिउल्ला शेख (वय ४६) आणि फारूक उस्मानगणी शेख (वय ३९) अशी अटक बांगलादेशी आरोपींची नावे आहेत.

सूरतमध्ये राहत असल्याचे दिले पुरावे
रियाज हुसेन शेख हा इलेक्ट्रिशन असून, अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरात राहतो, तर सुलतान शेख हा रिक्षाचालक असून, मालाड येथील मालवणीत राहतो. त्याचप्रमाणे इब्राहिम शफिउल्ला शेख याचा भाजी विक्रीचा व्यवसाय असून, तो माहुल गावात राहतो. फारुख शेख हा जोगेश्वरी पश्चिम येथील ओशिवरा या परिसरात राहतो. हे चारही आरोपी मूळचे बांगलादेशातील नोवाखाली जिल्ह्यातील कबीर हाट या गावातील आहेत. या बांगलादेशींवर बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्य करत असल्याबाबत मुंबईत गुन्हे दाखल आहेत. ते गुजरात राज्यातील सुरत येथे राहण्यास असल्याचे पुरावे प्राप्त केले. त्याआधारे त्यांनी पासपोर्ट प्राप्त केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आले. त्याचप्रमाणे ५ वॉन्टेड आरोपींनीदेखील पासपोर्ट बनवल्याचं दिसून आलं. त्यातील एक आरोपी पासपोर्टच्या आधारे सौदी अरेबिया येथे नोकरीसाठी गेल्याचे तपासात निष्पन्न झाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.