Mahayuti Ajit Pawar : राष्ट्रवादी नेत्यांमुळे नव्या वादाची शक्यता

245
Mahayuti Ajit Pawar : राष्ट्रवादी नेत्यांमुळे नव्या वादाची शक्यता

लोकसभेला पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर आत्मपरीक्षण करण्याऐवजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांना आता विधानसभेचे वेध लागले आहेत. छगन भुजबळ यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे दुसरे आमदार अनिल पाटील यांनी महायुतीत विधानसभेच्या २८८ पैकी ८० जागांची मागणी करीत महायुतीत दबावतंत्राचा वापर सुरू केल्याचे चित्र आहे. यामुळे महायुतीत नव्या वादाला तोंड फुटाण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Mahayuti Ajit Pawar)

जाहीर वक्तव्ये करणे टाळावे

महायुतीमधील नेत्यांनी जाहीर वक्तव्ये करणे टाळावे, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतरही राष्ट्रवादी नेत्यांकडून माध्यमांसमोर बोलण्यासाठी काही नेत्यांची, विशेषतः अजित पवार यांच्या पक्षाच्या, स्पर्धा लागल्याचे दिसते. (Mahayuti Ajit Pawar)

(हेही वाचा – NEET UG 2024 परीक्षा रद्द करणे आणि समुपदेशनावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिला नकार)

आताच जागा आणि उमेदवारांची घोषणा करा

छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणूक निकाल लागण्याचीही वाट न पाहताच विधानसभेला महायुतीत पक्षाला ८०-९० जागा मिळाल्या पाहिजे, अशी मागणी पक्षाच्या एका कार्यक्रमात केली. आता अनिल पाटील यांनी पक्षाला किमान ८० जागा मिळाव्या, अशी मागणी केली. “आता जे निकष ठरले आहेत, त्यानुसार आमची अपेक्षा आहे की, ८० जागा पक्षाने लढवल्या पाहिजेत. आणि आतापासूनच जागेचे आणि उमेदवाराचे मेरिट तपासून जागांची घोषणा करण्याच्या कामाला लागले पाहिजे. ८० जागांची मागणी आम्ही करू आणि तेवढ्या आम्हाला मिळतील,” असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. (Mahayuti Ajit Pawar)

युती करायला चॅनलवाले येणार का?

यावर तिखट प्रतिक्रिया देताना शिवसेना (शिंदे) प्रवक्ते संजय शिरसाट यांनी त्यांना समज देत सांगितले की, “पाटील यांनी १००-१५० जागा मागाव्या, पण महायुतीच्या बैठकीत. असे न्यूज चॅनेलवर मागून जागा मिळणार का? युती करायला चॅनलवाले येणार का? ज्या गोष्टी बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही, त्या बोलणे उचित नाही,” असा टोलाही शिरसात यांनी लगावला. (Mahayuti Ajit Pawar)

राष्ट्रावादी महायुतीत किती दिवस काढेल?

भाजपा-शिवसेना युती ही एक नैसर्गिक युती असून राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेला घरोबा ही एक राजकीय तडजोड असल्याचे भाजपा नेत्यांकडून वेळोवेळी स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून येणाऱ्या अशा मागण्या आणि वक्तव्ये यामुळे महायुतीत अजित पवार यांचा राष्ट्रावादी पक्ष किती दिवस काढेल, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Mahayuti Ajit Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.