Ratnagiri जिल्ह्यात दरड कोसळली, अनेक गावांचा संपर्क तुटला; नेमकं काय घडलं? जाणून घ्या

197
Ratnagiri जिल्ह्यात दरड कोसळली, अनेक गावांचा संपर्क तुटला; नेमकं काय घडलं? जाणून घ्या
Ratnagiri जिल्ह्यात दरड कोसळली, अनेक गावांचा संपर्क तुटला; नेमकं काय घडलं? जाणून घ्या

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील खेड (Khed) तालुक्यातील अस्तान-धनगरवाडी येथे भूस्खलन होऊन दरड कोसळल्याची (landslide) घटना घडली. मुख्य रस्त्यावर दरड कोसळल्यानं बांदरी पट्ट्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून खेड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या कोसळणाऱ्या पावसामुळे दरड कोसळली आहे. तीन वर्षांपूर्वी याच परिसरात घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली होती. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या २ दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील १८ गाव बांदरी पट्ट्यात असणाऱ्या अस्तान- धनगरवाडी या ठिकाणी डोंगरावर भूस्खलन होऊन मोठी दरड कोसळली आहे. ही दरड मुख्य रस्त्यावरती सोमवारी मध्यरात्री कोसळली. त्यानंतर या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

(हेही वाचा – Military Forces: पुण्यातील सैनिकी वैद्यकीय महाविद्यालय करणार सैनिकांना तणावमुक्त ! )

भूस्खलनामुळं परिसरात भीतीचं वातावरण
अस्तान गावासोबतच वडगाव, बिरमनी ही गावेदेखील दरडग्रस्त गावे आहेत. भूस्खलनामुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत देखील याच गावाशेजारी असणाऱ्या परिसरात दरड कोसळून २ जणांचा मृत्यू झाला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.