नायगावमध्ये लोकलचा विचित्र अपघात; मोटरमन गंभीर जखमी 

91

पश्चिम रेल्वेवरील नायगाव येथील रेल्वे स्थानकाजवळ एक विचित्र अपघात झाला. इथे विरार लोकल ट्रेनला क्रेनच्या हुकचा फटका बसला. यात विरार लोकलचा मोटरमन गंभीर जखमी झाला. मोटारमनच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली.

असा झाला अपघात 

नायगाव रेल्वे स्थानकात रेल्वेच्या कामासाठी क्रेन उभी करण्यात आली आहे. या  क्रेनच्या हुकचा फटका येथून जाणाऱ्या विरार लोकल ट्रेनच्या काचेला बसला. मोटरनमच्या केबीजवळ या क्रेनच्या हुकाचा फटका बसला. यामुळे या अपघातात मोटरमनच्या डोक्याला दुखापत झाली तो असून गंभीर जखमी झाला. नायगाव रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर चर्चगेट विरार ही ट्रेन शुक्रवारी, २७ जानेवारी रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास प्लॅटफॉर्मवर येताच रेल्वेच्या कामासाठी उभ्या असलेल्या एका ट्रेलरचा हुक ट्रेनच्या मोटरमॅनच्या डब्ब्याला समोरून लागला. यामुळे मोटरमनच्या केबीनची काच फुटली. या अपघातात काचेचा तुकडा मोटरमॅन एम डी आरिफ यांच्या डोळ्याला आणि डोक्याला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. यामुळे ट्रेन नायगाव रेल्वे स्थानकातच थांबवण्यात आली. डोळ्यातून रक्तसत्राव होऊ लागला. जखमी मोटरमनना तात्काळ उपचारासाठी रुग्णायलात दाखल करण्यात आले. त्यानंतर या ट्रेन मधील प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून येणाऱ्या लोकलने विरार रेल्वे स्थानकात सोडण्यात आले.

(हेही वाचा मविआने मालाडच्या उद्यानाला दिलेले टिपू सुलतानाचे नाव काढण्याचे आदेश)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.