आमदार संजय जगतापांचा नातेवाईक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

92

पोलिसांच्या नावाने तीन लाखांची मागणी करणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून यात आणखी धक्कादायक म्हणजे तीन लाखांची मागणी करणारे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांचे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे राजकीय चर्चा देखील आता सुरू झाल्या आहेत. अक्षय सुभाष मारणे आणि गणेश बबनराव जगताप (रा .सासवड, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी सासवड पोलिसात अर्ज केला होता. त्या अर्जावरून सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घोलप यांच्या करीता तीन लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच या मागणीमध्ये गणेश जगताप नावाच्या व्यक्तीने देखील मदत केल्याचे समोर आले असून यावरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ताब्यात घेण्यात आले आहे.

(हेही वाचा अमेरिकेकडून जगाचा विश्वासघात; १५ लाख रेडिओ ऍक्टिव्हच्या पाण्याची गळती)

अटक केलेल्यापैकी एकजण आमदार संजय जगताप यांचा जवळचा नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संजय जगताप यांचा या घटनेशी काही संबंध तर नाही ना अशा चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. याशिवाय अक्षय मारणे आणि गणेश जगताप हे आणखी राजकीय नेत्यांची कामे करत असल्याचे बोलले जात आहे.

ही कारवाई पोलिस अधिक अमोल तांबे, अप्पर अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक. क्रांती पवार, पोलिस निरीक्षक संदीप वऱ्हाडे, सहायक पोलिस निरीक्षक मुकुंद आयचीत यांनी केली आहे. या घटनेत राजकीय नाव आल्याने आता चर्चांना उधाण आले आहे. संजय जगताप यांचा नातेवाईक असल्याने राजकीय चर्चांना आता उधाण आले आहे. तसेच ते दोघेजण अजून कुठल्या राजकीय नेत्यांची कामे करतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.