ठाण्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त; २० पिस्तुलांसह एका मशीनगनचा समावेश

146
ठाण्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त; २० पिस्तुलांसह एका मशीनगनचा समावेश
ठाण्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त; २० पिस्तुलांसह एका मशीनगनचा समावेश

ठाण्यातील क्राईम ब्रँचने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे, याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रासाठ्यात २० पिस्तुल, एक मशीनगन आणि २ भरलेल्या मॅगझीनसह २८० जिवंत काडतुसांचा समावेश आहे. ठाण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालेल्या शस्त्रसाठ्यामुळे एकच खळबळ उडाली असून एवढा मोठा शस्त्रसाठा कशासाठी आणण्यात आला होता याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुरजितसिंग उर्फ माजा आवसिंग (२७) असे शस्त्रासाठ्यासह अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सुरजितसिंग हा मूळचा मध्यप्रदेश राज्यातील उमर्टीगाव जिल्हा बडवानी येथे राहणारा आहे. सुरजितसिंग याच्यावर वर्षभरापूर्वी ठाण्यातील वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता, या गुन्ह्यात सुरजितसिंग हा फरार होता.

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ५ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांचे पथक याच्या मागावर असताना सुरजितसिंग हा धुळे जिल्ह्यातील पलासनेस येथून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठ्यासह येणार असल्याची माहिती वपोनि. घोडके यांना मिळाली, दरम्यान घोडके यांनी आपल्या पथकाला सुरजितसिंग याच्या मागावर पाठवुन तो दुसरीकडे पळून जाण्यापूर्वी त्याला अटक करण्याचे आदेश दिले.

(हेही वाचा – ‘जीएसटी’ काऊन्सील बैठक : ऑनलाईन-गेमिंग’ महागणार तर ‘या’ गोष्टी होणार स्वस्त)

वागळे युनिट-५, ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, सहा. पो. नि. भुषण शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. नि. अविनाश महाजन, पो. उप. निरी सुनिल अहिरे, पो. हवा संदिप शिंदे, रोहीदास रावते, सुनिल निकम, शशिकांत नागपुरे, विजय पाटील, माधव वाघचौरे, सुनिल रावते, विजय काटकर, अजय साबळे, सुनिता गिते, मिनाक्षी मोहिते, उत्तम शेळके, तेजस ठाणेकर, यश यादव, या पथकाने धुळे येथे सापळा रचून ठाण्याच्या दिशेने निघालेल्या सुरजितसिंग याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्यात पोलिसांना २० गावठी स्टीलच्या पिस्तुल, १ गावठी मशीनगन, २ मॅगझीन आणि २८० जिवंत काडतुसे मिळून आली. सुरजितसिंग याला अटक करून मंगळवारी ठाण्यात आणण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा शस्त्रसाठा ठाण्यात कोणाला देण्यात येणार होता याबाबत अधिक तपास सुरू आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.