Laila Khan Murder Case: अखेर १३ वर्षांनी न्याय मिळाला! अभिनेत्री लैला खानच्या सावत्र वडिलांना फाशी

125
Laila Khan Murder Case: अखेर १३ वर्षांनी न्याय मिळाला! अभिनेत्री लैला खानच्या सावत्र वडिलांना फाशी
Laila Khan Murder Case: अखेर १३ वर्षांनी न्याय मिळाला! अभिनेत्री लैला खानच्या सावत्र वडिलांना फाशी

अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणी (Laila Khan Murder Case) मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी परवेझ टाक याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. अभिनेत्री लैला खानच्या (Laila Khan Murder Case) हत्येच्या प्रकरणाच्या 13 वर्षानंतर न्यायालयाने आपला निकाल सुनावला आहे. दोषी परवेझ टाक (Parvez Tak) हा मृत लैला खानचा सावत्र पिता आहे. फेब्रुवारी 2011 मध्ये परवेझ टाकने लैला खान आणि तिच्या कुटुंबातील इतर पाच सदस्यांची इगतपुरी येथील फार्म हाऊसवर निर्घृण हत्या केली आणि मृतदेह तिथेच जमिनीखाली पुरले होते. मुंबई सत्र न्यायालयाने हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्याचे म्हणत परवेझला फाशीची शिक्षा दिली. (Laila Khan Murder Case)

सेलिनानंतर लैला आणि तिच्या चार भावंडाची हत्या

हे संपूर्ण प्रकरण 13 वर्षे जुने आहे. दोषी परवेझने लैला, तिची आई आणि चार भावंडांची हत्या केली होती. हत्येनंतर त्यांचा मृतदेह फार्म हाऊसमध्ये पुरला होता. पोलिसांच्या चौकशीत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. लैलाचे वडील नादिर पटेल यांनी मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. टाक आणि त्याचा साथीदार आसिफ शेख यांनी लैला आणि तिच्या कुटुंबीयांचे अपहरण केल्याचे तक्रारीत म्हटले होते. फेब्रुवारी 2011 मध्ये ही घटना घडली. नाशिकमधील इगतपुरी येथील बंगल्यात परवेझ टाकचा सेलिनासोबत वाद झाला. त्यानंतर या वादातून तिने त्याची हत्या केली. परवेझने सेलिनानंतर लैला आणि तिच्या चार भावंडाची हत्या केली. (Laila Khan Murder Case)

(हेही वाचा –मुघलांच्या इतिहासाची भलावण करणाऱ्या Sharad Pawar यांना भगवद्गीता आणि मनाचे श्लोक डोळ्यांत खुपतायेत…)

एकाच कुटुंबातील सहाजणांची हत्या झाल्याची घटना काही महिन्यांनंतर उघडकीस आली. परवेझ टाकला जम्मू-काश्मीर पोलिसांनी फसवणुकीच्या प्रकरणात अटक केल्यानंतर सगळे प्रकरण उघडकीस आले. सुरुवातीला परवेझ टाक हा आपले सगळे कुटुंबिय हे दुबईत असल्याचे सांगत होता. जम्मू-काश्मीर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने लैला आणि इतरांची हत्या केली असल्याचे सांगितले. त्याच्या या कबुली जबाबानंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. टाक याने जम्मू-काश्मीरमध्ये वन कंत्राटदार म्हणून काम केले. (Laila Khan Murder Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.