मुघलांच्या इतिहासाची भलावण करणाऱ्या Sharad Pawar यांना भगवद्गीता आणि मनाचे श्लोक डोळ्यांत खुपतायेत…

236
मुघलांच्या इतिहासाची भलावण करणाऱ्या Sharad Pawar यांना भगवद्गीता आणि मनाचे श्लोक डोळ्यांत खुपतायेत...
मुघलांच्या इतिहासाची भलावण करणाऱ्या Sharad Pawar यांना भगवद्गीता आणि मनाचे श्लोक डोळ्यांत खुपतायेत...

आजपर्यंत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अभ्यासक्रमात इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास कमी आणि मुघलांचा इतिहास पाने भरून शिकवला जात होता. त्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी कधीही आक्षेप घेतला नाही. मात्र आता पाठ्यक्रमात भगवद्गीता आणि मनाचे श्लोक शिकवण्याचा निर्णय घेतल्यावर शरद पवारांना (Sharad Pawar) पोटशूळ उठला आहे. या निर्णयाला ते जाणीवपूर्वक जात्यंधतेचा आणि धर्मांधतेचा मुलामा लावण्याचा घृणास्पद प्रकार करू लागले आहेत. (Sharad Pawar)

(हेही वाचा –Sindhudurga Boat Accident : मच्छिमारांसाठी बर्फ घेऊन जाणारी बोट पलटली, दोन जणांचा मृत्यू तर दोन जण बेपत्ता)

राज्य सरकारने इयत्ता तिसरी ते बारावीच्या शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीता, मनाचे श्लोक समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीईआरटी’ने राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. दरम्यान, शरद पवार यांनी आज (२४ मे) दुष्काळी स्थितीवर भाष्य करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना नवीन शालेय अभ्यासक्रमावर प्रश्न विचारण्यात आला. (Sharad Pawar)

“सामजिक संस्थांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे”

शरद पवार म्हणाले, “राज्यातील शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि मनाचे श्लोक समाविष्ट करण्याचा विचार सुरु आहे, ही गोष्ट माझ्या कानावर आली. यावरुन राज्य सरकारची संविधानाच्या (Indian Constitution) बाबतीत काय मानसिकता आहे, हे लक्षात येते. त्यामुळे सामजिक संस्थांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. मुलांच्या डोक्यात नेमकं काय घालण्याचा प्रयत्न सुरु आहे, हे कळत नाही. याबाबत प्रागतिक विचाराचे जे कोणी लोक आहेत, त्यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे.” अशी भुमिका त्यांनी मांडली. (Sharad Pawar)

काँग्रेसच्या टीकेवर फडणवीसांचा पलटवार

विद्यार्थ्यांना शाळेत मनुस्मृतीमधील श्लोक शिकवण्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस पक्षाने टीकेची झोड उठवली होती. या मुद्द्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्याता आला. त्यांनी त्याला उत्तर देताना म्हटले की, “मी असल्या फाल्तू गोष्टींना उत्तर देत नाही. काँग्रेसला हल्लीच्या काळात काहीच उद्योग उरलेले नाहीत. महाराष्ट्रात मनाचे श्लोक वर्षानुवर्षे बोलले जातात, ऐकले जातात. त्यांचा अभ्यासक्रमात समावेश होणार की नाही, याबाबत मला माहिती नाही. पण यावरुन विनाकारण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न योग्य नाही.” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. (Devendra Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.