Khichdi Scam : सुरज चव्हाण यांना २२ जानेवारी पर्यंत ईडी कोठडी

मुंबई महानगरपालिका (बीएमसी) खिचडी घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक करण्यात आलेल्या शिवसेना उबाठा गटाचे नेते सूरज चव्हाण यांना ईडी विशेष न्यायालयाने २२ जानेवारी पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

153
Khichdi Scam : सुरज चव्हाण यांना २२ जानेवारी पर्यंत ईडी कोठडी
Khichdi Scam : सुरज चव्हाण यांना २२ जानेवारी पर्यंत ईडी कोठडी

मुंबई महानगरपालिका (BMC) खिचडी घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक करण्यात आलेल्या शिवसेना उबाठा गटाचे (UBT Group) नेते सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना ईडी विशेष न्यायालयाने २२ जानेवारी पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. सूरज चव्हाण यांना गुरुवारी (१८ जानेवारी) दुपारी सत्र न्यायालयातील ईडीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. सूरज चव्हाण हे शिवसेनेचे पदाधिकारी तसेच उबाठा (UBT) नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहे. (Khichdi Scam)

कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेत झालेल्या खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर बुधवारी ईडीने सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना अटक केली. या प्रकरणात ईडीकडून पहिली अटक आहे. गुरुवारी चव्हाण यांना ईडीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने चव्हाण (Suraj Chavan) यांना २२ जानेवारी पर्यत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड-१९ महामारी दरम्यान स्थलांतरित कामगारांना खिचडी वाटपाशी संबंधित १ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारात चव्हाण (Suraj Chavan) यांचा सहभाग असल्याचा संशय होता. या गुन्ह्यातील रक्कम चव्हाण (Suraj Chavan) यांच्याशी निगडीत असल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यातील रकमेबाबत स्पष्ट करण्यात चव्हाण (Suraj Chavan) हे अयशस्वी ठरल्याने आणि तपासात सहकार्य न केल्याने त्याला अटक करण्यात आली, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. (Khichdi Scam)

(हेही वाचा – Sewage Channels : भांडुपसह विक्रोळीतील मलवाहिन्यांचे जाळे मजबूत होणार, घरोघरी शौचालय बांधण्याचे स्वप्न होईल साकार)

मुंबई महानगरपालिकेच्या खिचडी घोटाळा प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार दाखल केली होती. आर्थिक गुन्हे शाखेने या तक्रार अर्जाचा तपास करून आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आर्थिक गुन्हे शाखेकडून यापूर्वी सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना चौकशीसाठी बोलावले होते, त्याच बरोबर शिवसेना नेते संजय राऊत तयांचे धाकटे बंधू संदीप राऊत, गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर, सुजित पाटकर यांची देखील या प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने खिचडी घोटाळा प्रकरणात सुजित पाटकर याचा न्यायालयातून ताबा घेऊन अटक करण्यात आली होती. (Khichdi Scam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.