Kurla : कुर्ल्यात पूर्ववैमनस्यातून सराईत गुंडाकडून एकावर गोळीबार

विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

158
Kurla : कुर्ल्यात पूर्ववैमनस्यातून सराईत गुंडाकडून एकावर गोळीबार
Kurla : कुर्ल्यात पूर्ववैमनस्यातून सराईत गुंडाकडून एकावर गोळीबार
पूर्ववैमनस्यातून एकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजता कुर्ला पश्चिम मालकडवाला कंपाउंड येथील जय शंकर चौक येथे घडली. ऐन सणासुदीच्या दिवशी झालेल्या या गोळीबारामुळे कुर्ल्यात एकच खळबळ उडाली असून गोळीबारानंतर पळून गेलेल्या गुंडाचा कसून शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशिष लक्ष्मण पवार (४०) आणि गणेश पवार असे हल्लेखोरांचे नावे आहेत. आशिष पवार हा सराईत गुन्हेगार असून कुर्ला,विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर १०पेक्षा अधिक गंभीर गुन्हे असून काही गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर आलेला आहे. विनोबा भावे नगर पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी तडीपार केले होते.


(हेही वाचा –BJP : भाजपचे उमेदवार वसुंधरा राजे ठरविणार)

कुर्ला पश्चिम मसराणी लेन येथील जय शंकर चौक या ठिकाणी राहणारा संतोष पवार सोबत आशिष पवार यांचे जुने वैर आहे. आशिष पवार हा देखील त्याच परिसरात राहणारा असून बुधवारी रक्षाबंधन असल्यामुळे आशिष हा राखी बांधण्यासाठी जय शंकर चौक येथे आला होता. सकाळी १०वाजण्याच्या सुमारास संतोष आणि आशिष हे समोरासमोर आले व दोघात शाब्दिक वाद झाला, या वादात आशिष सोबत असलेल्या गणेशने संतोष वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता संतोष तेथून पळून गेला, पळून जात असताना आशिषने स्वताजवळील रिव्हॉल्व्हर काढून संतोष पवार च्या दिशेने गोळीबार केला, त्यात संतोष हा थोडक्यात बचावला.

या गोळीबाराच्या घटनेमुळे ऐन सणासुदीच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबाराची माहिती मिळताच विनोबा भावे नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पोलीस आल्याचे येत असल्याचे कळताच आशिष आणि गणेश यांनी घटनास्थलावरून पळ काढला. याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आशिष आणि गणेश यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=FW7TLG4EX4Y&t=3s

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.