Nuh Violence : हरियाणातील हिंसाचार चिघळला; २२ एफआयआर दाखल तर, १५ जणांना अटक

रेवाडी, गुडगाव, पलवल, फरीदाबादसह ५ जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू

107
Nuh Violence : हरियाणातील नूहमधला हिंसाचार चिघळला; २२ एफआयआर दाखल तर, १५ जणांना अटक
Nuh Violence : हरियाणातील नूहमधला हिंसाचार चिघळला; २२ एफआयआर दाखल तर, १५ जणांना अटक

हरियाणातील नूह येथे ३१ जुलै रोजी विश्व हिंदू परिषदेच्या ब्रज मंडल यात्रेदरम्यान हिंसाचार आणि नंतर गोंधळ निर्माण झाला होता. परंतू, आता या हिंसाचाराची झळ गुरुग्रामपर्यंत पोहोचली आहे. नूह येथील हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत २२ एफआयआर दाखल करण्यात आले असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे.

हरियाणातील नूहमध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी दोन दिवस कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण परिसरात निमलष्करी दलाच्या २० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. रेवाडी, गुडगाव, पलवल, फरीदाबादसह ५ जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्याचबरोबर इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.

(हेही वाचा – मनोरा आमदार निवासाचे ३ ऑगस्टला भूमिपूजन; चार वर्षांनी मिळाला मुहूर्त)

दरम्यान, या हिंसाचारामध्ये २२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, १५ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, सुमारे १५० हून अधिक लोकांची या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.