Gangster Prasad Pujari याला चीनमधून अटक ; मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई

मुंबई गुन्हे शाखेने शनिवारी (२३ मार्च) त्याला मोक्का कायदा अंतर्गत अटक केली. तसेच गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार प्रसाद पुजारी मोक्का न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

136
Gangster Prasad Pujari याला चीनमधून अटक ; मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई
Gangster Prasad Pujari याला चीनमधून अटक ; मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई

मागील २० वर्षांपासून फरार असलेला गँगस्टर प्रसाद पुजारी (Gangster Prasad Pujari) याला चीनमधून अटक करण्यात आली आहे. कुख्यात गुंड छोटा राजन आणि कुमार पिल्लई टोळीतील परदेशात असलेला एकमेव गँगस्टर प्रसाद पुजारी (Gangster Prasad Pujari) हा परदेशातुन भारतात खंडणी रॅकेट चालवत होता. मुंबई गुन्हे शाखेने शनिवारी (२३ मार्च) त्याला मोक्का कायदा अंतर्गत अटक केली. तसेच गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार त्याला मोक्का न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (Gangster Prasad Pujari)

(हेही वाचा- JCB Pattern : नेत्यांच्या स्वागताचा “जेसीबी पॅटर्न”)

कोण आहे गँगस्टर प्रसाद पुजारी ?

गँगस्टर प्रसाद पुजारी (Gangster Prasad Pujari) हा छोटा राजन आणि कुमार पिल्लई गॅंगसाठी काम करीत होता, त्यानंतर त्याने स्वतःची टोळी तयार करून भारतात बांधकाम व्यवसायिक आणि उद्योगपतींना धमकी देऊन खंडणी उकळण्यास सुरुवात केली होती. मुंबईमध्ये प्रसाद पुजारी यांच्यावर ९ गंभीर गुन्ह्याची नोंद आहे, त्यात खंडणी, हत्येचा प्रयत्न, धमकी यासारखे गंभीर गुन्हे आहेत. २०२३ मध्ये त्याने एका बांधकाम व्यवसायिकाला धमकावल्याचा शेवटचा गुन्हा मुंबईत दाखल झाला होता. (Gangster Prasad Pujari)

चीन ते मुंबई प्रवास :

एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (२२ मार्च) प्रसाद पुजारीला चीनमधून मुंबईत आणले. २०१० मध्ये प्रसाद पुजारी हा मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेच्या हातून निसटून चीनला पळून गेला होता. यानंतर इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. हद्दपार करण्यात आलेला गुंड कुमार पिल्लईचा असणारा प्रसाद पुजारी २०१० पासून अधिकाऱ्यांना टाळत होता. चीनमधून त्याचे प्रत्यार्पण करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून २०१० पासून प्रयत्न सुरू होते. अखेर चीनने गेल्या वर्षी प्रत्यार्पणाला मान्यता दिल्यानंतर त्याला शनिवारी भारतात आणण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश आले. प्रसाद पुजारी हा प्रवासी व्हिसावर चीनमध्ये गेला होता, व तिकडे त्याने एका चिनी महिलेशी लग्न करून राहत होता. दरम्यान तो चीनमधून पत्नीसह दुसऱ्या देशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना चिनी पोलिसांनी विमानतळावर त्याला अटक केली होती. त्यानंतर चीनने त्याला भारताच्या ताब्यात देण्याची तयारी दर्शवली होती. (Gangster Prasad Pujari)

(हेही वाचा- Maharashtra Cricket Association Stadium : गहुंजेतील ‘स्टेट ऑफ द आर्ट’ क्रिकेट स्टेडिअममध्ये आणखी काय सुविधा आहेत?)

गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रसाद पुजारीवर (Gangster Prasad Pujari) मुंबईत नऊ गुन्हे दाखल आहेत. २०१९ मध्ये विक्रोळी येथे गोळीबाराच्या प्रकरणात पुजारीचा समावेश होता, तर २०२३ मध्ये त्याने शहरातील एका बांधकाम व्यवसायिकाला शेवटचा खंडणी कॉल केला होता. (Gangster Prasad Pujari)

गँगस्टर प्रसाद पुजारीच्या आईला अटक …

२०२० मध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रसाद पुजारीची आई इंदिरा विठ्ठल पुजारीला खंडणी प्रकरणात अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६२ वर्षीय इंदिरा आणि इतर दोघांवर मुंबईतील एका बिल्डरकडून १० लाख रुपयांची खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे. सुनील आंगणे (५६) आणि सुकेश कुमार (२८ ) अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. (Gangster Prasad Pujari)

(हेही वाचा- Himachal Operation Lotus : काँग्रेसचे ६ बंडखोर आणि ३ अपक्ष आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश)

आईचे डीएनए जुळले…

२०१० पासून फरार असलेला प्रसाद पुजारी गेल्या वर्षी मार्चमध्ये हाँगकाँगमध्ये इंटरपोलच्या नोटिशीवर पकडला गेला होता. पुजारीची फाईल आणि त्याच्या कुटुंबाचे डीएनए नमुने, विशेषत: त्याच्या आईचे डीएनए चीनी सरकारला पाठवल्या जाणाऱ्या डॉसियरसोबत जोडले गेले होत. हे नमुने जुळल्यानंतर चीनने प्रसाद पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांना दिला. (Gangster Prasad Pujari)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.