Maharashtra Cricket Association Stadium : गहुंजेतील ‘स्टेट ऑफ द आर्ट’ क्रिकेट स्टेडिअममध्ये आणखी काय सुविधा आहेत?

पुण्यातील क्रिकेट स्टेडिअमविषयी या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

138
Maharashtra Cricket Association Stadium : गहुंजेतील ‘स्टेट ऑफ द आर्ट’ क्रिकेट स्टेडिअममध्ये आणखी काय सुविधा आहेत?
  • ऋजुता लुकतुके

आयसीसीच्या भारतात नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील काही सामने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झाले होते. आणि यातीलच एक सामना होता भारत विरुद्ध बांगलादेश. मुंबईहून पुण्याला द्रूतगती महामार्गावरून जाताना वाटेत गहुंजे हे गाव लागतं. आणि तिथेच हे स्टेडिअम उभारण्यात आलं आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुरुष व महिला संघाचं हे होम ग्राऊंड आहे. २०१२ मध्ये या स्टेडिअमचं उद्घाटन होईपर्यंत पुणे गावातील नेहरु स्टेडिअम हे महाराष्ट्र क्रिकेटचं माहेरघर होतं. (Maharashtra Cricket Association Stadium)

पण, या स्टेडिअमच्या उभारणीनंतर इथं सातत्याने आंतरराष्ट्रीय कसोटी तसंच एकदिवसीय सामने आणि आयपीएलचे सामनेही झाले आहेत. मधले दोन हंगाम पुणे वॉरियर्सचा संघ आयपीएलमध्ये खेळला. त्या संघाचं घरचं मैदान अर्थातच हे स्टेडिअम होतं. तर एरवीही मुंबईचे काही सामने या मैदानावर झाले आहेत.  पण, या स्टेडिअमची उभारणी झाली आहे ती एका वादातून. नेहरु मैदानावर सामने भरवताना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि पुणे महानगरपालिका यांच्यात वाद निर्माण झाला. तिकीट विक्री आणि त्यातून मिळणारा निधी यावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला. आणि पुढे भारत विरुद्ध श्रीलंका हा सामनाच कोलकाताला बहाल करावा लागला. पुणे महानगरपालिकेनं या सामन्यासाठी स्टेडिअमला सोयी पुरवण्यात असमर्थता दाखवली. (Maharashtra Cricket Association Stadium)

(हेही वाचा – Mahua Moitra सीबीआयच्या रडारवर, अनेक ठिकाणी छापे सुरू)

याच स्टेडिअमवर स्टिव्ह स्मिथने झळकावलं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक

त्यानंतर क्रिकेट असोसिएशनने नवीन स्टेडिअम उभारणीचा निर्णय घेतला. आणि त्यावर त्वरित अंमलबजावणीही सुरू केली. ऑक्टोबर २००७ मध्ये तेव्हाचे बीसीसीआयचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पायाभरणी समारंभ पार पडला. आणि बांधकामाला सुरुवात झाली. ३५ एकर जागेवर वसलेल्या या स्टेडिअमसाठी १.५ अब्ज रुपयांचा खर्च अपेक्षित होता. आणि डिसेंबर २०१० पर्यंत ते पूर्ण होणार होतं. पण, हे काम अनेक अडचणींमुळे आणखी दोन वर्षं लांबलं. शापूरजी पालनजी यांनी बांधकामाचं कंत्राट मिळवलं होतं. तर स्टेडिअमचे वास्तूविशारद होते लंडनमधील साऊदॅम्पटन स्टेडिअमचे सर्वेसर्वा मायकेल हॉपकिन्स. (Maharashtra Cricket Association Stadium)

स्टेडिअमच्या उद्घाटनानंतरही २०१५ मध्ये त्याला आयसीसीकडून कसोटी आयोजन करण्यासाठी परवानगी मिळाली. पहिली कसोटी या स्टेडिअमवर झाली ती फेब्रुवारी २०१७ मध्ये या कसोटीत ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथने शतक झळकावलं होतं. या मैदानावरील हे पहिलं आंतरराष्ट्रीय शतक. ऑस्ट्रेलियाने हा सामनाही ३३३ धावांनी जिंकला होता. त्यानंतर या मैदानावर २०१९ मध्ये आणखी एक कसोटी सामना पार पडला आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा हा सामना होता. (Maharashtra Cricket Association Stadium)

(हेही वाचा – Rohit on Dhoni : धोनीने कप्तानी सोडल्यावर रोहित शर्माने धोणीला काय म्हटलं?)

मुख्य मैदानात इतक्या खेळपट्ट्या

या मैदानामुळे काही वादही निर्माण झाले आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी तयार केलेल्या खेळपट्टीला आयसीसीने खूप खराब अशा शेरा मारला होता. तर एका खाजगी भारतीय वाहिनीने या मैदानावरील क्युरेटर साळगावकर यांच्या विरोधात केलेलं स्टिंग ऑपरेशनही गाजलं होतं. आयसीसीच्या आचार संहितेच्या विरोधात जाऊन साळगावकर त्या व्हिडिओत बाहेरच्या लोकांना त्यांनी बनवलेली खेळपट्टी दाखवत होते. त्यांना आयसीसी आणि बीसीसीआयने ६ महिन्यांसाठी निलंबित केलं होतं. (Maharashtra Cricket Association Stadium)

स्टेडिअममध्ये ४५,००० हजारांची आसन क्षमता आहे. मुख्य मैदानात १५ खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. पावसानंतर कमी वेळात मैदान खेळण्यायोग्य व्हावं यासाठी मैदानात तीन प्रकारच्या वाळूंचे स्तर रचण्यात आले आहेत. शिवाय त्याखाली जमिनीत वाहून जाणारी ड्रेनेज यंत्रणाही बसवण्यात आली आहे. मुख्य स्टेडिअमच्या दोन बाजूंना सदस्यांसाठी असलेला पॅव्हेलिअन स्टँड आणि मीडिया स्टँड बसवण्यात आला आहे. तर एक सरावासाठीचं मैदान आणि इनडोअर क्रिकेट अकादमीही इथं आहे. प्रशिक्षणासाठी येणाऱ्या मुलांच्या रहाण्याची सोयही इथं होऊ शकते. क्रिकेट बरोबरच इथं स्कॉश, बॅडमिंटन, जलतरण तलाव, बार, स्पा अशा सुविधाही आहेत. एकावेळी ३,५०० कार आणि १२,००० दुचाकी इथं पार्क होऊ शकतात. (Maharashtra Cricket Association Stadium)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.