Himachal Operation Lotus : काँग्रेसचे ६ बंडखोर आणि ३ अपक्ष आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश

भारतीय जनता पक्षाच्या नऊ आमदारांच्या पाठिंब्याने राज्यातील एकमेव जागेसाठी राज्यसभेची निवडणूक जिंकल्यानंतर गेल्या महिन्यात मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार अडचणीत आले होते.

160

राज्यसभा निवडणुकीत हिमाचलमध्ये ऑपरेशन लोटसची (Himachal Operation Lotus) पायाभरणी करण्यात आली. या निवडणुकीत व्हिप न पाळल्यामुळे सहा बंडखोर काँग्रेस आमदारांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्या मतदारसंघात निवडणूक जाहीर केल्या आहेत. आता तीन अपक्ष आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यांच्याही मतदारसंघात पोट निवडणूक होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत यातील सर्व ६ बंडखोर आमदार आणि ३ अपक्ष आमदारांनी शनिवार, २३ मार्च रोजी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे हिमाचलमध्ये ऑपरेशन लोटस (Himachal Operation Lotus) यशस्वी झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

(हेही वाचा Swatantra Veer Savarkar Film : ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट करमुक्त करावा; रणजित सावरकर यांची मागणी)

सहा बंडखोर आमदारांवर कारवाई 

काँग्रेसचे सहा आमदार आणि तीन अपक्ष आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून ते भाजपच्या तिकिटावर येथून पोटनिवडणूक लढवू शकतात, असेही सांगण्यात येत आहे. राज्यसभा निवडणुकीत व्हिप न पाळल्याने सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र राणा, इंदर दत्त लखनपाल, चैतन्य शर्मा आणि देवेंद्र कुमार भुट्टो या सहा बंडखोर काँग्रेस आमदारांवर २९ फेब्रुवारी रोजी कारवाई करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने त्यांच्या मतदारसंघातील पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. तर आशिष शर्मा, होशियार सिंग आणि केएल ठाकूर या तीन अपक्ष आमदारांनी शुक्रवारी राजीनामे दिले. त्यांच्या मतदारसंघातही पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. आम्ही आमचा राजीनामा सुपूर्द केला आहे. आम्ही भाजपमध्ये प्रवेश करू आणि पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवू, असे होशियार सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (Himachal Operation Lotus) भारतीय जनता पक्षाच्या नऊ आमदारांच्या पाठिंब्याने राज्यातील एकमेव जागेसाठी राज्यसभेची निवडणूक जिंकल्यानंतर गेल्या महिन्यात मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार अडचणीत आले होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.