कोविड टेंडर घोटाळा – कंत्राटदार यासीर फर्निचरवाला परदेशातून कोणाच्या संपर्कात होते?

219
कोविड टेंडर घोटाळा - कंत्राटदार यासीर फर्निचरवाला परदेशातून कोणाच्या संपर्कात होते?
कोविड टेंडर घोटाळा - कंत्राटदार यासीर फर्निचरवाला परदेशातून कोणाच्या संपर्कात होते?

कोविड टेंडर घोटाळा प्रकरणी ईडीच्या रडारवर असलेला मुंबई महानगर पालिकेतील बडा कंत्राटदार यासीर फर्निचरवाला हा परदेशातुन परतला आहे. ईडीने त्याच्या घराची झडती घेतली असून ईडीच्या अधिकारी यांनी काही तांत्रिक पुरावे ताब्यात घेतले आहे. यासीर परदेशात असताना त्या काळात तो काही अधिकारी आणि मध्यस्थीच्या संपर्कात होता असा संशय ईडीच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे, या अनुषंगाने ईडी तपास करीत असल्याचे समजते.

मुंबई महानगर पालिकेत झालेल्या कोविड जम्बो सेंटर आणि टेंडर घोटाळा प्रकरणी ईडी तपास करीत आहे, या प्रकरणात ईडीने आता पर्यंत मनपाचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, युवासेना पदाधिकारी सूरज चव्हाण आणि सुजित पाटकर यांच्यासह कोविड काळात मनपा कडून कंत्राटे देण्यात आलेल्या कंत्राटदार यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकण्यात आले होते.

मुंबई महानगर पालिकेतील बडा कंत्राटदार यासीर फर्निचरवाला यांच्या वरळी येथील निवास स्थानी ईडीचे अधिकारी दाखल झाले होते, मात्र फर्निचरवाला हा कुटुंबासोबत परदेशात गेल्यामुळे त्याच्या घराला कुलूप होते. ईडीच्या अधिकारी यांनी फर्निचरवाला मुंबईत येत नाही तो पर्यत तात्पुरते त्यांचे निवासस्थान सील केले होते. काही दिवसांपूर्वी फर्निचरवाला कुटुंबियांसह मुंबईत परतले असता ईडीचे अधिकारी यांनी फर्निचरवाला यांच्या निवास स्थानाची झडती घेऊन काही कागदपत्रे आणि तांत्रिक पुरावे ताब्यात घेण्यात आले आहे.

(हेही वाचा – आषाढी यात्रेत ८ लाख ८१ हजार विठ्ठलभक्तांनी केला एसटीतून सुरक्षित प्रवास)

दरम्यान ईडीने केलेल्या तांत्रिक पुराव्याच्या तपसावरून यासीर फर्निचरवाला हे परदेशात असताना मुंबईत सतत काही जणांच्या अवैधरित्या संपर्कात होते, आणि त्यांच्याशी या संदर्भात अनधिकृतरित्या समन्वय साधत होते असा संशय ईडीच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. संपर्कात असणाऱ्या पैकी काही मनपाचे वरिष्ठ अधिकारी दर्जाचे अधिकारी आणि मध्यस्थी पुरवठादार असल्याची शक्यता ईडीच्या सूत्रांकडून वर्तवली जात आहे. फर्निचरवाला यांचे त्यांच्याशी काही आर्थिक व्यवहार होते का हे पडताळून पहात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.