Dombivli Crime : डोक्यात दगड घालून रिक्षाचालकाचा खून; अडीच वर्षांनंतर खुनी पोलिसांच्या जाळ्यात

84
Dombivli Crime : डोक्यात दगड घालून रिक्षाचालकाचा खून; अडीच वर्षांनंतर खुनी पोलिसांच्या जाळ्यात
Dombivli Crime : डोक्यात दगड घालून रिक्षाचालकाचा खून; अडीच वर्षांनंतर खुनी पोलिसांच्या जाळ्यात
  • कल्याण : प्रतिनिधी

Dombivli Crime : डोंबिवलीतील एका खळबळजनक हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात विष्णूनगर पोलिसांना (Vishnunagar Police) तब्बल अडीच वर्षांनंतर यश आले आहे. ओल्या पार्टी दरम्यान झालेल्या किरकोळ वादातून रिक्षाचालक असलेल्या मित्राची हत्या करून फरार झालेला मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. विशेष म्हणजे या खुन्याला पकडण्यासाठी पोलिसांनी नांदेडमध्ये ५ दिवस शेतमजुराचा वेष धारण केला होता. (Dombivli Crime)

दीपक साहेबराव करकडे (२८, रा. पेगर गव्हाण, ता. जि. परभणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून कल्याण न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पश्चिम डोंबिवलीतील देवीचा पाडा परिसरात असलेल्या खाडीच्या किनारी २७ नोव्हेंबर २०२३ रोजी सोमनाथ शिंदे (Somnath Shinde) या रिक्षाचालकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. दारूच्या पार्टी दरम्यान झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडली होती. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी यापूर्वीच विलन विष्णू ठावरे (४१, रा. उमेशनगर, डोंबिवली-पश्चिम) आणि योगेश तिमाप्पा डोंगरे (४२, रा. लोटेवाडी, मोठागाव, डोंबिवली-पश्चिम) या दोघांना अटक केली होती. मात्र या संपूर्ण हत्याकांडाचार मुख्य सूत्रधार दीपक करकडे हा घटनेनंतर तात्काळ फरार झाला होता. (Dombivli Crime)

(हेही वाचा – Nasha Mukt Bharat अभियांनासाठी देश सज्ज! २.० ॲपच्या रूपात नागरिकांच्या हाती नवीन शस्त्र; अशा प्रकारे व्हा मोहिमेत सामील)

दीपक करकडे हा गेल्या अडीच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याने स्वतःची ओळख लपविण्यासाठी अत्यंत सावधगिरी बाळगली होती. त्याने स्वतःकडे कोणतेही ओळखपत्र जसे की आधारकार्ड वा पॅनकार्ड ठेवले नव्हते. इतकेच नव्हे तर पोलिसांना ट्रॅक करता येऊ नये म्हणून तो कधीही मोबाईलचा वापर करत नव्हता. हा खुनी नांदेडमध्ये एका शेतात मजूर म्हणून काम करत होता, जेणेकरून कुणालाही त्याच्यावर संशय येणार नाही. अखेर हा खुनी नांदेड (Nanded) मधील एका शिवारात लपला असल्याची खबर विष्णूनगर पोलिसांना मिळाली होती.

कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे, विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांच्या मार्गदर्शनाखाली खुन्याला शोधण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शकील जमादार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनील पवार, हवा. नितीन भोसले, शशिकांत रायसिंग यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. आरोपीचा कोणताही तांत्रिक सुगावा उपलब्ध नसताना पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार नांदेड गाठले. (Dombivli Crime)

(हेही वाचा – IPL 2026 : एस श्रीसंतचा धक्कादायक दावा, हरभजनने स्लॅपगेटमधून १ कोटी रुपये कमावले)

पारंपारिक तपास पद्धतीने लावला छडा

खुनी ज्या भागात लपला होता त्या वाटेगाव परिसरात पोलिसांनी सलग ५ दिवस शेतमजुराचा वेष धारण करून वास्तव्य केले. शेतमजूर म्हणून वावरताना पोलिसांनी दीपकची ओळख पटवली आणि योग्य संधी मिळताच त्याला बेड्या ठोकल्या. कोणत्याही डिजिटल पुराव्याशिवाय केवळ पारंपरिक तपास पद्धती आणि जिद्दीच्या जोरावर पोलिसांनी ही कारवाई पूर्ण केल्याबद्दल जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त संजय जाधव, पोलिस उपायुक्त अतुल झेंडे (Atul Zende) यांनी या पथकाचे कौतुक केले आहे. (Dombivli Crime)

असा घडला होता हत्याकांड

पश्चिम डोंबिवलीतील सत्यवान चौक परिसरातील स्मशानभूमीच्या मागे असलेल्या खाडीच्या किनारी २७ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास मृत सोमनाथ शिंदे, योगेश डोंगरे, विलन टावरे आणि दिपक करकडे या चौघा मित्रांनी ओली पार्टी केली. व्यवसायाने रिक्षाचालक असलेल्या चौघांनी एकत्र बसून दारू ढोसली. त्यानंतर चौघेही स्मशानभूमीच्या मागे खाडी किनारी गेले. तेथे सोमनाथचा तिघांशी किरकोळ कारणावरून वाद झाला. दारूने झिंगलेल्या चौघांमध्ये हमरीतुमरी झाल्यानंतर तिघांनी मिळून सोमनाथच्या डोक्यात दगड घातला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सोमनाथला पाहून हल्लेखोरांनी त्याचा आणखी दगडांचा वापर करून मुडदाच पाडला. तेथून पळालेले तिघेही मारेकरी भूमिगत झाले. दगडांनी ठेचून खून केलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या सोमनाथ शिंदे याच्या खून्यांपर्यंत पोहोचण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. यातील योगेश डोंगरे आणि विलन टावरे या दोघांना अवघ्या १६ तासांत जेरबंद करण्यात आले होते. मात्र चकवा देत असलेला मुख्य मारेकरी दीपक करकडे तब्बल अडीच वर्षांनी पोलिसांच्या हाती लागला आहे. दगडांनी ठेचून सोमनाथचा जागीच मुडदा पाडून पसार झाल्याची कबुली देणाऱ्या दीपक करकडे याला कल्याण न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावणी आहे. (Dombivli Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.