Digital Arrest : निवृत्त बँक व्यवस्थापकाला १.८३ कोटींचा गंडा; कुटुंब ३५ दिवस मानसिक कैदेत

282
Kalyan Crime : दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे सांगून आजोबांना 'डिजिटल अरेस्ट'; २८ लाखांचा गंडा
  • संतोष वाघ

Digital Arrest     मुलुंड पूर्व परिसरात सायबर गुन्हेगारांनी कायद्याचा धाक दाखवत ‘डिजिटल अटक’चा बनाव करून एका निवृत्त बँक व्यवस्थापकाची तब्बल १ कोटी ८३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड पूर्व येथे राहणारे अशोक महादेव साळवी (वय ६२) हे केनरा बँकेतून व्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले आहेत. ७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी त्यांना एका महिलेचा फोन आला. त्यांच्या नावावर बनावट सिमकार्ड काढून घाटकोपर परिसरात बेकायदेशीर संदेश पाठविण्यात आल्याचा दावा करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले. (Digital Arrest)

(हेही वाचा – इराणची सागरी ‘आत्मघाती सेना’ सज्ज; ‘गदीर’ Mini Submarine मुळे अमेरिकेच्या विमानवाहू नौका बनल्या असुरक्षित)

त्यानंतर कॉल कथित क्राइम ब्रँच व सीबीआय अधिकाऱ्यांकडे जोडण्यात आला. स्वतःला आयपीएस अधिकारी जयप्रभाकर चौगुले असे सांगणाऱ्या व्यक्तीने साळवी यांचा आधार क्रमांक ‘क्राइम लिस्ट’मध्ये असल्याचे सांगत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. सर्वोच्च न्यायालय व ईडीच्या नावाने बनावट कागदपत्रे व लोगो दाखवून विश्वास संपादन करण्यात आला. गुन्ह्याची चौकशी ‘टॉप सीक्रेट’ असल्याचे सांगून कुटुंबातील कुणालाही माहिती दिल्यास तात्काळ अटक होईल, अशी धमकी देण्यात आली. साळवी, त्यांची पत्नी व मुलगी यांना घरातील एका खोलीत बसून दर दोन तासांनी अहवाल देण्यास भाग पाडण्यात आले. पत्नीच्या मोबाईलवर सतत व्हिडिओ कॉल सुरू ठेवून कुटुंबावर मानसिक दबाव टाकण्यात आला. (Digital Arrest)

(हेही वाचा – मुंबईतून कोकणात अवघ्या ५ तासांत पोहचा; Ro-Ro Ferry ने मिळणार सुखद अनुभव)

१४ ते ३१ जानेवारी दरम्यान ठगांनी दिलेल्या विविध बँक खात्यांमध्ये मोठ्या रकमा वर्ग करण्यात आल्या. दबावामुळे कुटुंबाने मुदतठेवी तोडल्या, सोने गहाण ठेवले आणि शेअर्सही विकले. दरम्यान, वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या. ११ फेब्रुवारी रोजी अचानक सर्व कॉल बंद झाले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याची जाणीव कुटुंबाला झाली. १८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन १९३० वर तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी संबंधित बँक खात्यांची माहिती गोळा करून तपास सुरू केला असून पुढील कारवाई सुरू आहे. (Digital Arrest)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.