Delhi Murder : दिल्ली पुन्हा हादरली; स्वित्झर्लंडहून बॉयफ्रेंडला भेटायला आलेल्या महिलेची हत्या

63
Delhi Murder : दिल्ली पुन्हा हादरली; स्वित्झर्लंडहून बॉयफ्रेंडला भेटायला आलेल्या महिलेची हत्या

पुन्हा एकदा दिल्ली हत्याकांडाने (Delhi Murder) हादरली आहे. पश्चिम दिल्लीच्या तिलक नगर परिसरात शुक्रवारी २० ऑक्टोबर रोजी एका स्विस महिलेच्या हत्येप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. निना बर्जर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी सरकारी शाळेजवळ सापडला. या मृतदेहाचा अर्धा भाग कचऱ्याच्या काळ्या पिशवीत झाकलेला होता. या प्रकरणात पोलिसांनी गुरप्रीत सिंग नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी (Delhi Murder) स्वित्झर्लंडमध्ये महिलेला भेटले आणि त्यानंतर दोघांची मैत्री झाली. बर्जरला भेटायला अनेकदा स्वित्झर्लंडला जाणाऱ्या गुरप्रीतला तिचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध असल्याचा संशय होता, असे पोलिसांनी सांगितले.

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर गुरप्रीतने (Delhi Murder) बर्जरच्या हत्येचा कट रचला आणि तिला भारतात येण्यास सांगितले. गुरप्रीतच्या विनंतीवरून, बर्जर ११ ऑक्टोबर रोजी भारतात आली.

(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : ड्रग प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते – चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप)

पाच दिवसांनंतर, गुरप्रीतने पीडितेला एका खोलीत नेले, तिचे हात आणि पाय बांधले आणि तिची हत्या (Delhi Murder) केली. सुरुवातीला त्याने बर्जरचा मृतदेह एका कारमध्ये ठेवला. मात्र, गाडीतून दुर्गंधी येऊ लागल्याने त्याने तिचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिला आणि घटनास्थळावरून पळून गेला.

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने वाहनाचा नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी (Delhi Murder) गुरप्रीतचा शोध घेतला. त्यांनी मृतदेह ठेवलेली कार आणि गुरप्रीतची दुसरी चार चाकी जप्त केली. त्यांनी गुरप्रीतच्या घरातून २.२५ कोटी रुपये देखील जप्त केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.