दर्शना पवार हत्या प्रकरण, आरोपी राहुल हंडोरे अखेर पोलिसांच्या ताब्यात

राहुल सध्या फूड डिलिव्हरी बॉयचं काम करत होता.

195
दर्शना पवार हत्या प्रकरण, आरोपी राहुल हंडोरे अखेर पोलिसांच्या ताब्यात

दर्शना पवार हीच्या मारेकऱ्याला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. गुरुवार २२ जून रोजी पोलिसांनी आरोपी राहुल हंडोरे याला अंधेरीतून अटक केली. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या राहुलला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

काही दिवसांपूर्वी दर्शना पवार या तरुणीचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली होती. एमपीएससी या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर तिचा एका संस्थेकडून सन्मान करण्यात आला. त्या सन्मानासाठी पुण्याला गेलेली दर्शना अचानक बेपत्ता झाली. त्यानंतर तिच्या घरच्यांनी तिच्या गायब होण्याची तक्रार पोलिसांत नोंदवली. त्यानंतर अचानक वेल्हा तालुक्यात असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तिचा मृतदेह सापडला.

तिची हत्या झाल्याचं पोस्टमॉर्टमच्या अहवालातून उघड झाल्यापासून पोलीस आरोपीच्या शोधात होते.

(हेही वाचा – पश्चिम बंगाल : वीज कोसळून ७ जणांचा मृत्यू)

का केली हत्या

दर्शना पवार आणि राहुल हंडोरे हे एकमेकांना फक्त ओळखतच नव्हते तर ते नातेवाईक आहेत. दोघांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केली होती. परंतु एमपीएससीमध्ये यश राहुल ऐवजी दर्शनाला आधी मिळाले. दोघांना अधिकारी होऊ लग्न करायचे होते. राहुल याला दर्शनासोबत लग्न करण्याची इच्छा होती. परंतु तो एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाला नाही, हीच मोठी लग्नासाठी अडचण ठरली.

दर्शनाच्या घरच्या मंडळींनी तिचे लग्न दुसर्‍या मुलासोबत जमवले होते. लग्नाची तयारीसुद्धा सुरु झाली. या लग्नामुळे राहुल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने दर्शनाला अन् तिच्या कुटुंबियांना एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा, असा आग्रह धरला. तो देखील परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल, असे तो सांगत होता. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही. यामुळे राहुलने दर्शनाला संपवण्याचा निर्णय घेतला.

राहुल सध्या फूड डिलिव्हरी बॉयचं काम करत होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.