Cyber Fraud : शेअर ट्रेडिंगचा मोह नडला; निवृत्त प्राध्यापकाला लावला तब्बल १५.४ लाखांचा चुना

87
इन्स्टाग्रामवरील 'Tubi TV' जाहिरातीच्या मोहात महिलेने गमावले २.८३ लाख; कांजुरमार्गमध्ये सायबर फसवणूक

जळगाव जिल्ह्यातील चोपड्यातून समोर आला असून यात निवृत्त प्राध्यापकाला तब्बल १५ लाख ४० हजार रुपयांना गंडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चोपडा येथील रहिवासी दीपक बन्सीलाल गुजराथी (वय ६५) यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात अनोळखी भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Maharashtra Rain Alert: राज्यावर ‘दुहेरी’ सावट; ‘या’ भागांत मुसळधार पाऊस व गारपिटीची शक्यता)

फेसबुकवरील जाहिरात ठरली सापळा

निवृत्त प्राध्यापक दीपक गुजराथी हे २७ फेब्रुवारी रोजी फेसबुक वापरत असताना, त्यांना ‘SBI Securities Back End Trading System’ या नावाने एक जाहिरात दिसली. अधिक नफ्याचे आमिष दाखवणाऱ्या या जाहिरातीला बळी पडून त्यांनी दिलेल्या लिंकवर आपली वैयक्तिक माहिती भरली. त्यानंतर ५ मार्च रोजी त्यांना सविता रमेश नावाच्या महिलेचा व्हिडिओ कॉल आला. तिने प्रोफाईल पडताळणीच्या बहाण्याने गोड बोलून गुजराथी यांचा विश्वास संपादन केला. सायबर चोरट्यांनी गुजराथी यांना एक संशयास्पद लिंक पाठवून ‘SBI Securities’चे बनावट अॅप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यास सांगितले. सायबर चोरट्यांच्या सांगण्यावरून गुजराथी यांनी सुरुवातीला १०,००० रुपये गुंतवले.

(हेही वाचा – Hindustan Post Impact : धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचे उघडले कवाड; बाळगोपाळांसह ज्येष्ठ नागरिकही सुखावले)

या गुंतवणुकीवर त्यांना लगेच १,३२५ रुपयांचा नफा झाल्याचे बनावट अॅपमध्ये दाखवण्यात आले. यामुळे त्यांचा विश्वास बसला. विश्वास बसल्यामुळे प्राध्यापकांनी वेळोवेळी चोरट्यांनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये एकूण १५ लाख ४० हजार रुपये जमा केले. जेव्हा गुजराथी यांनी आणखी पैसे भरण्यास असमर्थता दर्शवली, तेव्हा भामट्यांनी त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी त्याच बनावट अॅपमध्ये चक्क ६ लाख रुपयांचे बनावट कर्ज मंजूर केले आणि उर्वरित रक्कम भरण्यासाठी तगादा लावला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.