-
प्रतिनिधी
Crime पनीरमध्ये अळी आढळल्याचा दावा करत त्याचे ‘रिल्स’ बनवून एका पनीर विक्रेत्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका तथाकथित ‘रिल्सस्टार’ला मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. रणदीपसिंग गुजराल (४०, रा. मुलुंड) असे या आरोपीचे नाव असून, याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime)
(हेही वाचा – Russian Crude Oil : अमेरिकेला न जुमानता, भारताची रशियाकडून तेल खरेदी सुरुच; आयातीत विक्रमी वाढ)
आरोपी रणदीपसिंग हा सोशल मीडियावर सक्रिय असून त्याचे इंस्टाग्रामवर १० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच तो ‘आफ्टरनून टाईम्स’ नावाचे डिजिटल पोर्टलही चालवतो. काही दिवसांपूर्वी त्याने मुलुंड पश्चिम येथील एका नामांकित पनीरच्या दुकानातील पनीरमध्ये ‘अळी’ आढळल्याचे दाखवणारे एक रिल बनवले होते. हे रिल त्याने आपल्या पोर्टलवर आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. त्यानंतर, हा बदनामीकारक व्हिडीओ हटवण्यासाठी त्याने संबंधित दुकानदाराकडे दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. (Crime)
(हेही वाचा – Muslim : आदित्य पटेल बनून जिहादी करीम रफिकने १०० महिलांची केली फसवणूक)
धमकावल्यामुळे त्रस्त झालेल्या पनीर विक्रेत्याने मुंबई गुन्हे शाखेकडे धाव घेत तक्रार नोंदवली. या तक्रारीची दखल घेत गुन्हे शाखा कक्ष-५ च्या पथकाने सापळा रचला. रविवारी खंडणीच्या रकमेपैकी ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना रणदीपसिंगला रंगेहात अटक करण्यात आली. मुलुंड पोलिसांनी आरोपीवर खंडणीचा गुन्हा दाखल केला असून, त्याला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपीला १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सोशल मीडियाचा वापर करून अशाप्रकारे व्यावसायिकांची बदनामी करून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा किंवा व्यक्तींचा पोलीस शोध घेत आहेत. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

