-
प्रतिनिधी
FDA सौंदर्यप्रसाधनांच्या नावाखाली ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आक्रमक पवित्रा घेतला आहे. एफडीएने मुंबई आणि कराडमध्ये केलेल्या संयुक्त कारवाईत ५.१६ लाख रुपयांची बेकायदा व चुकीचे लेबल असलेली सौंदर्यप्रसाधने जप्त केली आहेत, तर कराडमधील २९ लाख रुपयांचा साठा गोठवण्यात आला आहे. (FDA)
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरातील ‘ब्युटी सेंटर’ या दुकानावर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या कारवाईत १ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, यामध्ये ‘डेली डिव्हाईन नॅचरल ब्रेस्ट एनलार्ज’, ‘बट एनहान्समेंट’ आणि ‘फॅट बर्नर’ यांसारख्या शरीराचा आकार बदलण्याचा दावा करणाऱ्या इसेन्शियल ऑइल ब्लेंड्सचा समावेश होता. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही उत्पादने दिशाभूल करणारे दावे करत असल्याचे समोर आले आहे. ही उत्पादने नेमकी कुठे तयार होतात, याचा तपास एफडीए करत आहे. (FDA)
(हेही वाचा – Muslim : आदित्य पटेल बनून जिहादी करीम रफिकने १०० महिलांची केली फसवणूक)
दुसरीकडे, कांदिवली (पश्चिम) येथील ‘रेडियंट क्रिएशन्स’ या विक्रेत्यावरही एफडीएने कारवाई केली. कोणतीही वैध परवानगी नसताना येथे औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन करून त्यांची साठवणूक केली जात होती. धाडीदरम्यान, उत्पादन करण्यासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री आणि कच्चा मालही जप्त करण्यात आला. यामध्ये बुरशीविरोधी (अँटी-फंगल) क्रीम, खाज कमी करणारी मलम आणि सौंदर्यप्रसाधने असा एकूण ३ लाख ९६ हजार ८३० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. (FDA)
‘औषध आणि सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४०’ अंतर्गत या दोन्ही प्रकरणांमध्ये दोषींवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा एफडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे. (FDA)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

