Crime: पिंपरी-चिंचवड शहरात ४५ कोटींच्या ड्रग्ससह पोलीस फौजदाराला अटक

189
Manipur Police: भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४७ जण मणिपूर पोलिसांच्या ताब्यात

पिंपळे निळख परिसरात (Crime) २ कोटींचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स विक्रीच्या प्रयत्नातील युवकाला अटक केल्यानंतर आरोपीच्या संपर्कातील पोलीस फौजदाराचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचा संशय पोलिसांना होता. निगडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असणाऱ्या फौजदार विकास शेळके याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे फौजदार शेळके याच्याकडून ४५ कोटी रुपये किमतीचे ४४.५० किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

विकास शेळके (निगडी पोलीस ठाणे), असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी नमामी शंकर झा (३२, रा. निगडी. मूळ रा. बिहार) याला सुरुवातीला अटक केकरण्यात आली होती. पोलीस अंमलदार विजय मोरे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी, (१ मार्च) पहाटे साडेचारच्या सुमारास पिंपळे निलख येथे सांगवी पोलिसांकडून सुरुवातीला कारवाई करण्यात आली होती. तेव्हा नमामी शंकर झा ( ३२, रा. निगडी. मूळ रा. बिहार) याला अटक करून त्याच्याकडून २ कोटी रुपये किमतीचे २ किलो ३८ ग्रॅम वजनाचे एमडी जप्त करण्यात आले होते. आरोपी नमामी झाकडे कडे जे ड्रग्स आढळून आले त्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस दलातील निगडी पोलिस स्टेशनचा अधिकारी विकास शेळके याचाही सहभाग असल्याचं उघड झालं आहे.

(हेही वाचा – Deep Cleaning : मशीद बंदर परिसरात रस्त्यांची सफाई, पण वाढीव आणि अनधिकृत बांधकामांची साफसफाई कधी? )

या प्रकरणात पोलिसांचा थेट सहभाग असल्याचे उघड झाल्याने एकच गोंधळ उडाला. अति वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केलेल्या कसून चौकशी नंतर फौजदार शेळके याला मध्यरात्री अटक करण्यात आली असून, त्यानंतर त्याच्याकडून ४४.५० किलो एमडी जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान अटक करण्यात आलेल्या विकास शेळके याच्या मालकीच्या पिंपरी-चिंचवड शहरात दोन ते तीन हॉटेल्स असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास अमली पदार्थ विरोधी पथकाकडून सुरू आहे. शेळके याने यापूर्वी ड्रग्स तस्करी केली आहे का? या प्रकरणात आणखी कोणते अधिकारी सहभागी आहेत का याचा शोध सुरू आहे.

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवड पोलीस दलाची मान खाली गेली आहे. कारण १५ दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील २ कर्मचारी खंडणी उकळल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते, तर दोन अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याची लाच प्रकणात बदली करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.