Crime : हुंड्यासाठी २२ वर्षीय विवाहितेचे मुंडण; कल्याणमध्ये सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

77
Illustration of a distressed woman with wedding items and money.
Crime : हुंड्यासाठी २२ वर्षीय विवाहितेचे मुंडण; कल्याणमध्ये सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल
  • प्रतिनिधी 

Crime             हुंड्यासाठी छळवणूक करणाऱ्या सासरच्या मंडळींनी एका २२ वर्षीय विवाहितेचे बळजबरीने मुंडण केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. या अमानवीय कृत्यामुळे विवाहिता मानसिक धक्क्यात असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Crime)

अफसाना समीर अन्सारी (२२) असे पीडित महिलेचे नाव आहे. अफसानाचे लग्न २०२४ मध्ये कल्याणच्या वालधुनी येथे राहणाऱ्या समीर अन्सारीसोबत झाले होते. या दांपत्याला आठ महिन्यांचे बाळ आहे. लग्नानंतर काही महिन्यांपासूनच पती, सासू, सासरे, नणंद आणि सासूची बहीण गौसिया यांनी अफसानाचा हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला होता. माहेरची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने ती पैसे आणू शकत नव्हती, त्यामुळे तिचा छळ अधिकच वाढला होता. (Crime)

(हेही वाचा – Jammu-Kashmirच्या राजौरी जिल्ह्यात भूसुरुंग स्फोट, लष्कराचे ४ जवान जखमी)

७ जून रोजी सासरच्या मंडळींनी अफसानाला “तुझ्या डोक्यात उवा झाल्या आहेत आणि त्यामुळे मुलाला दम्याचा त्रास होईल,” असे कारण देऊन बळजबरीने तिचे आणि आठ महिन्यांच्या चिमुकल्याचे मुंडण केले. या कृत्यामुळे अफसानाला मोठा मानसिक धक्का बसला. आपल्याला आणि आपल्या बाळाला सासरची मंडळी काहीतरी वाईट करतील, या भीतीने तिने तातडीने माहेर गाठले. मात्र, घडलेल्या प्रकारामुळे ती प्रचंड तणावात असून आजारी पडली आहे. (Crime)

रुग्णालयात उपचार घेत असताना डॉक्टरांनी या घटनेची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांना दिली. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन अफसानाचा जबाब नोंदवला. या आधारे पोलिसांनी पती समीर अन्सारी, सासू शहनाज, सासरे, नणंद आणि सासूची बहीण गौसिया यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५ (हुंड्यासाठी छळ), ११५(२) (दुखापत करणे) आणि ३५२(३)(५) (विद्रुपीकरण व अपमान करणे) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. “या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल,” अशी माहिती महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत परदेशी यांनी दिली आहे. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.