Cases In Mumbai : एका गुन्ह्याची उकल करताना, मुंबईतील २७ प्रकरणाची उकल 

वरळीच्या समुद्र किनारी मृत अवस्थेत मिळून आलेल्या तरुणीच्या हत्येचा तपास करता करता मुंबई पोलिसांनी २७ प्रकरणाची उकल केली.

126
Cases In Mumbai : एका गुन्ह्याची उकल करताना, मुंबईतील २७ प्रकरणाची उकल 
Cases In Mumbai : एका गुन्ह्याची उकल करताना, मुंबईतील २७ प्रकरणाची उकल 
वरळीच्या समुद्र किनारी मृत अवस्थेत मिळून आलेल्या तरुणीच्या हत्येचा तपास करता करता मुंबई पोलिसांनी २७ प्रकरणाची उकल केली. या २७ प्रकरणातील बहुतांश प्रकरणे  घरातुन पळून गेलेल्या अल्पवयीन मुलींचे आहे. धारावीतील अपहरणाच्या एका प्रकरणात १५ वर्षीय मुलीची मुलुंड येथुन सुटका करून तीन जणांना अपहरण आणि बलात्कार,पोक्सोच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
वरळीच्या समुद्र किनारी ४ जुलै रोजी पोलिसांना एका तरुणीचा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत एका गोणीत मिळून आला होता. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेचे असल्यामुळे मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही. या तरुणीची ओळख पटवून गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी वरळी पोलीस ठाणे तसेच मुंबई गुन्हे शाखेच्या विविध पथकाने तपास सुरू केला होता.

(हेही वाचा- Municipal Schools : महापालिका शाळांमध्ये पुन्हा रात्र अभ्यासिका वर्ग भरणार!)

क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून हरवलेल्या तरुणी तसेच अल्पवयीन मुली अशा एकूण २९८ जणांची यादी तयार करून त्यापैकी कोणी वरळी येथे मिळून आलेल्या मृत तरुणीपैकी कोणी आहे का या अनुषंगाने तपास सुरु करण्यात आला होता. वरळीतील गुन्ह्याचा तपास करता करता वरळी पोलीस आणि गुन्हे शाखेकडून मुंबईतून बेपत्ता झालेल्या २७ तरुणीचा शोध लावला. गुन्हे शाखेने ७  आणि इतर २० प्रकरणे वरळी आणि त्या परिमंडळातील पोलिसांनी तपास करून  तरुणीना शोधून काढण्यात आले. गुन्हे शाखेने, इतर सात बेपत्ता महिलांचा शोध घेतला, प्रत्येकी दोन आरएके मार्ग पोलीस ठाणे आणि धारावी परिसरात हरवलेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेतला तर शिवडी, माहीम आणि वडाळा परिसरातून प्रत्येकी एक गुन्ह्याची उकल करण्यात आली.
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “बहुतेक हरवलेल्या प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुली होत्या ज्या मुलांसोबत पळून गेल्या होत्या.” “तथापि, ते अल्पवयीन असल्याने, त्यांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारींच्या आधारे, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.”वरळी खून प्रकरणाची उकल करण्यासाठी पोलिसांनी वर्सोवा, जुहू, वांद्रे, मालवणी, मीरा-भाईंदर, वसई, विरार, कल्याण आणि ठाणे या किनारी भागावर लक्ष केंद्रित केले आहे . मात्र अद्याप वरळीत मिळून आलेल्या तरुणीची ओळख पटलेली नाही.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=LQ6kDvKUcdQ

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.