मनुस्मृती पेटवली Jitendra Awhad यांनी मात्र, भडका उडाला NCP च्या मंत्र्यांमध्ये

141
मनुस्मृती पेटवली Jitendra Awhad यांनी मात्र, भडका उडाला NCP च्या मंत्र्यांमध्ये

जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा फोटो असलेले पत्रक फाडले हे निंदनीय आहेच. पण छगन भुजबळांनी आव्हाडांची बाजू घेतली. मनुस्मृतीचा मुद्दा कुठे तरी बाजूला पडेल म्हणून आव्हाड यांना पाठिंबा देणारे विधान भुजबळ यांनी केले हे अत्यंत दुर्दैवी आहे. भुजबळांनी आव्हाड यांना खडेबोल सुनावले पाहिजे होते. त्यांची कृती ही अत्यंत चुकीची आहे. याबाबत त्यांनी बोलायला हवे होते, अशा शब्दांत हसन मुश्रीफ यांनी भुजबळ यांचा समाचार घेतला आहे. (Jitendra Awhad)

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन केल्यानंतर एकच वादळ उठले आहे. मनुस्मृती दहन करताना आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला. त्यामुळे भाजपाने आव्हाड यांच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शने करून संताप व्यक्त केला आहे. मात्र अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे आव्हाड यांच्या मदतीला धावून आले. भुजबळ यांनी आव्हाड यांची पाठराखण केल्याने अजित पवार गटाचेच मंत्री हसन मुश्रीफ यांनी भुजबळांवर टीका केली. यानिमित्ताने आता मुश्रीफ आणि भुजबळ यांच्यातच जुंपली आहे. (Jitendra Awhad)

(हेही वाचा – Indi Alliance च्या बैठकीला कोणते नेते उपस्थित आणि कोणते अनुपस्थित?)

छगन भुजबळ ठाम

मनुस्मृतीला बाजूला ठेवून अहिल्यादेवी होळकर, जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांना आठवले पाहिजे. मनुस्मृतीचा चंचूप्रवेश शालेय अभ्यासक्रमात होता कामा नये. जितेंद्र आव्हाड विरोधक आहेत. त्यांचा विरोध निश्चित करा, पण मनुस्मृती जाळा, जी बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली होती. आमची भूमिका फुले शाहू आंबेडकरांची आहे, असे भुजबळांनी जाहीर केले. (Jitendra Awhad)

राज्यसभेचे माहीत नाही

छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावरही मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्याबाबतची माझ्याकडे काहीच माहिती नाही. या संदर्भात आमचे नेते अजित पवारच सांगू शकतील, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. (Jitendra Awhad)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.