Home समाजकारण Mumbai-Goa Highway : सरकारचे आश्वासन फोल; गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यात ठेकेदार...

Mumbai-Goa Highway : सरकारचे आश्वासन फोल; गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यात ठेकेदार अपयशी

मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षे रखडल्यामुळे सरकारला टीकेचे धनी व्हावे लागत आहे.

58
Mumbai-Goa Highway : सरकारचे आश्वासन फोल; गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यात ठेकेदार अपयशी
Mumbai-Goa Highway : सरकारचे आश्वासन फोल; गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यात ठेकेदार अपयशी

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यात ठेकेदार अपयशी ठरल्यामुळे राज्य सरकार बॅकफूटवर आले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडील काम काढू घेऊन नव्या एजन्सीची नियुक्ती करण्याच्या हालचाली सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केल्या आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षे रखडल्यामुळे सरकारला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. विद्यमान सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी कोकणच्या सुपूत्रावर असल्याने टीकेची धार अधिक वाढली आहे. त्यामुळे येत्या गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाची एक लेन खुली करून कोकणवासीयांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु, एक लेन पूर्ण होत असताना, या महामार्गावर अन्यत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे.

ही बाब लक्षात घेऊन गणेशोत्सवापूर्वी या मार्गावरील सर्व खड्डे बुजवण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दिले होते. मात्र, या कामासाठी नेमलेल्या ठेकेदाराला नियत कालमर्यादेत खड्डे बुजवता न आल्याने कोकणवासीयांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या साबां विभागाने विद्यमान ठेकेदाराकडून काम काढून घेत नवीन एजन्सीची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

(हेही वाचा – M.K. Stalin support Udaynidhi Stalin : सनातन धर्माचा अवमान करणाऱ्या मुलाला तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे समर्थन; पंतप्रधानांनाच दिला सल्ला)

कोकणवारी खड्ड्यांतूनच!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री आग्रही आहेत. यासाठी त्यांनी गेल्या महिनाभरात अनेकवेळा पाहणी दौरा केला. मात्र, ठेकेदार कुचकामी निघाल्यामुळे त्यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याला बदलून स्वतंत्र्य एजन्सी नेमण्याची सूचना त्यांनी केली आहे. मात्र, गणेशोत्सव अवघ्या ११ दिवसांवर आल्याने त्याआधी नवी एजन्सी नेमून खड्डे भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे जवळपास अशक्य असल्यामुळे गणेशभक्तांची यंदाची कोकणवारी खड्ड्यांतूनच होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
error: Content is protected !!