मुंबई विमानतळाला बॉम्बने उडवणून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली असून सुरक्षा यंत्रणा (security system) अलर्ट मोडवर आहेत. धमकीचा मेल प्राप्त झाल्यानंतर तात्काळ अलर्ट जारी करण्यात आला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टीव्ही 9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, धमकीचा मेल मिळाल्यानंतर पोलीस आणि बीडीडीएसच्या पथकांन तात्काळ विमानतळ परिसराची तपासणी सुरू केली. तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. मात्र सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून कसून तपासणी सुरू आहे. पोलीस धमकी देणाऱ्याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा –
Crime : कल्याण-डोंबिवलीतील ज्येष्ठ महिला चोरांच्या टार्गेटवर; २४ तासांत चेन स्नॅचिंगच्या दोन घटना
Join Our WhatsApp Community


