Bank Fraud Case : सुनिल केदार यांना नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी ५ वर्षांचा कारावास

खासगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते.

143

कॉंग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनिल केदार यांना नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात ५ वर्षांचा कारावास आणि १२.५० लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घोटाळ्यातील आरोपींनाही शिक्षा सुनावण्यात येणार आली आहे.आमदारकी रद्द होण्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००२मध्ये १५० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा १९९९ साली सुनील केदार बँकेचे अध्यक्ष होते. ते या खटल्यातील मुख्य आरोपीसुद्धा आहेत. पुढे खासगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते. या प्रकरणाबाबत केदार तसेच इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकार विभागाचा कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करत ही रक्कम गुंतवण्यात आली होती.

(हेही वाचा – Narendra Modi: पंतप्रधान पाकिस्तान दौऱ्यावर जाणार का? पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ काय म्हणाले? वाचा सविस्तर… )

सुनील केदार, बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक अशोक नामदेव चौधरी, तत्कालीन मुख्य हिशेबणीस सुरेश दामोदर पेशकर (नागपूर), रोखे दलाल केतन कांतीलाल सेठ, सुबोध चंदादयाल भंडारी, नंदकिशोर शंकरलाल त्रिवेदी (मुंबई), अमित सीतापती वर्मा (अहमदाबाद), महेंद्र राधेश्याम अग्रवाल व श्रीप्रकाश शांतीलाल पोद्दार (कोलकाता) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश…
या प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात खटला भरण्यात आला. या कंपनीशी निगडित एकूण चार राज्यांमध्ये १९ ठिकाणी गुन्हे दाखल झाले. त्या सगळ्यांमध्येच प्रतिभूती दलाल म्हणून काम करणारे केतन सेठ आरोपी आहेत. हे सगळेच खटले एका ठिकाणी चालवावेत, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ५ ऑक्टोबर २०२१ रोजी न्यायालयाने तूर्त या खटल्यांची सुनावणी थांबविण्याचे आदेश दिले होते. २२ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला. त्यानुसार, सर्व पक्षांतर्फे युक्तिवाद पूर्ण करण्यात आला. वरिष्ठ अधिवक्ते सुबोध धर्माधिकारी आणि अॅड. देवेन चौहान यांनी सुनिल केदारेंकडून युक्तिवाद केला. याखेरीज चौधरी यांच्याकडून त्यांचे वकील अशोक भांगडे यांनी युक्तिवाद केला. अखेर, या प्रकरणाचा निकाल सुनावण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली. त्यानुसार, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. पेखले-पूरकर मंगळवारी खटल्याचा निकाल सुनावला.

(हेही वाचा – Raj – Uddhav Thackeray : उद्धव आणि राज ठाकरे समोरासमोर; चर्चांना उधाण )

शिक्षा कोणाला होणार? 

दोषी
सुनील केदार
अशोक चौधरी
केतन सेठ
सुबोध गुंडारे
नंदकिशोर त्रिवेदी
अमोल वर्मा

निर्दोष – श्रीप्रकाश पोद्दार, सुरेश पेशकर, महेंद्र अग्रवाल

आमदारकी रद्द होणार का ?

२ वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते. केदार यांना दोन वर्षांहून अधिक शिक्षा झाल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते.

सुनील केदार
अशोक चौधरी
केतन सेठ
सुबोध गुंडारे
नंदकिशोर त्रिवेदी
अमोल वर्मा

निर्दोष – श्रीप्रकाश पोद्दार, सुरेश पेशकर, महेंद्र अग्रवाल

मदारकी रद्द होणार का ?

२ वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते. केदार यांना दोन वर्षांहून अधिक शिक्षा झाल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.