B.S. Yediyurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

१७ वर्षांच्या पीडितेच्या सोबत असलेल्या आईनं गुरुवारी संध्याकाळी पोलिसांत तक्रार नोंदवली आणि मध्यरात्री माजी मुख्यमंत्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक अत्याचाराची कथित घटना २ फेब्रुवारी २०२४ रोजी घडली.

228
B.S. Yediyurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा (B.S. Yediyurappa) यांच्यावर एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला असून त्यांच्यावर पॉक्सो (लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण) कायदा आणि आयपीसीच्या 354 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवार १४ मार्च रोजी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Supreme Court : लहान मुलांचे अश्लील चित्रपट पाहणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा कडक इशारा)

नेमका प्रकार काय ?

अधिक माहितीनुसार; बेंगळुरूच्या सदाशिवनगर पोलिसांनी १७ वर्षीय मुलीच्या आईच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. येडियुरप्पांविरोधात (B.S. Yediyurappa) दाखल केलेल्या एफआयआरनुसार, ही घटना २ फेब्रुवारी रोजी घडली. या मायलेकी येडियुरप्पा यांच्याकडे आपली अडचण घेऊन त्यावर मदत मागण्यासाठी गेल्या होत्या.

(हेही वाचा – Batman Squad : रेल्वेचे ‘बॅटमॅन’ रात्रीचे तैनात, बॅटमॅन पथकाकडून तिकीट तपासणी)

पोलीस सूत्रांनी ‘द हिंदूला’ दिलेल्या माहितीनुसार, POCSO कायद्याच्या कलम ८ आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (B.S. Yediyurappa)

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार;

१७ वर्षांच्या पीडितेच्या सोबत असलेल्या आईनं गुरुवारी संध्याकाळी पोलिसांत तक्रार नोंदवली आणि मध्यरात्री माजी मुख्यमंत्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक अत्याचाराची कथित घटना २ फेब्रुवारी २०२४ रोजी घडली, जेव्हा आई आणि मुलगी एका फसवणूक प्रकरणात माजी मुख्यमंत्र्यांकडे मदत मागण्यासाठी गेल्या होत्या. (B.S. Yediyurappa)

(हेही वाचा – NCP MLA Disqualification Cas : राष्ट्रवादीच्या विधान परिषदेतील आमदारांची अपात्रता सुनावणी आजपासून)

आतापर्यंत येडियुरप्पा (B.S. Yediyurappa) यांनी या आरोपांबाबत कोणतेही विधान केलेले नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.