देशात डिजिटल व्यवहार झपाट्याने वाढत आहेत, पण त्याच वेगाने वाढत आहेत सायबर गुन्हेही. नागरिकांच्या खिशावर आणि गोपनीयतेवर डोळा ठेवणाऱ्या या गुन्ह्यांविरोधात केंद्र आणि राज्य सरकार(State Govt) सज्ज झाले आहेत. यावेळी मात्र मोहिमेचा पल्ला खूप मोठा आहे.
गेल्या काही दिवसांत विविध ठिकाणी बनावट कॉल, फसवे मेसेज, लिंकवर क्लिक करून खात्यातून लाखोंचा गंडा अशा घटना वाढल्या आहेत. सायबर पोलिसांच्या (Cyber police) आकडेवारीतही मोठी उडी दिसून येत आहे. त्यामुळे यंदा सरकारकडून केवळ इशारे किंवा पत्रकापुरते न राहता प्रत्यक्ष कृतीतून मोठ्या उपक्रमाला सुरुवात होत आहे.
(हेही वाचा – उत्तर प्रदेशात ‘ऑपरेशन कलावा’; Love Jihad पीडितांना परत आणण्यासाठी ‘नवदुर्गा टास्क फोर्स’)
येत्या २५ सप्टेंबरपासून देशव्यापी सायबर सुरक्षा(Cyber Security) आणि गोपनीयता जनजागृती अभियान सुरू होणार आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज(Bombay Stock Exchange)मध्ये होणाऱ्या ‘रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’ या विशेष कार्यक्रमातून याची सुरुवात होईल. माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार(Ashish Shelar) यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार असून CERT-In, SEBI, BSE तसेच गृह मंत्रालयाचे वरिष्ठ मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या महिनाभर चालणाऱ्या अभियानात नागरिकांना सायबर सुरक्षिततेच्या सर्वोत्तम पद्धती शिकवल्या जाणार असून, ऑनलाईन सुरक्षित कसे राहायचे याचे थेट मार्गदर्शन होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

