Mumbai Crime : मुलुंड येथील गार्डनच्या शौचालयात जळालेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह 

मुलुंड पोलिसांनी या महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालय येथे पाठवला असून प्राथमिक तपासावरून पोलिसांनी अपमृत्यू नोंद केली आहे.

66
Mumbai Crime : मुलुंड येथील गार्डनच्या शौचालयात जळालेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह 
Mumbai Crime : मुलुंड येथील गार्डनच्या शौचालयात जळालेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह 
ठाण्यात राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह मुलुंड पश्चिम येथील एका बागेच्या महिला स्वछतागृहात मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुलुंड पोलिसांनी या महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालय येथे पाठवला असून प्राथमिक तपासावरून पोलिसांनी अपमृत्यू नोंद केली आहे. काही दिवसांपूर्वीच वडाळा येथे एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला होता, एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. (Mumbai Crime)
मुलुंड पश्चिम स्वप्ननगरी या ठिकाणी असलेल्या वसंत गार्डन (बाग) येथील महिला शौचालयात रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एक महिला पेटत असताना स्थानिकांनी आणि तेथील सुरक्षा रक्षकाने आग विझवुन पोलीस आणि अग्निशमनदलाला कळवले. अग्निशमनदल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाली व आगीत भाजलेल्या महिलेला तात्काळ मुलुंड जनरल रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासून महिलेला मृत घोषीत केले, या प्रकरणी पोलिसांनी प्राथमिक तपासावरून अपमृत्यूची नोंद करून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही तसेच मिळालेल्या वस्तूवरून तपासल्या असता सदर महिला ही ठाणे पश्चिम रघुनाथ नगर येथे राहणारी स्नेहल अमित बोबडे ही असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. (Mumbai Crime)
पोलिसांनी याबाबत महिलेचे पती अमित बोबडे यांना याबाबत कळवून त्यांचा जबाब नोंदवून घेतला असता, मागील काही महिन्यांपासून स्नेहल आणि तिच्या पतीसोबत कौटुंबिक वाद सुरू होता. यातून तिने आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आम्ही सर्व बाजूने तपास करीत आहोत, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहे, त्यात ही महिला एकटीच शौचालयात जात असल्याचे दिसून येत आहे, सध्यातरी काहीही संशयास्पद दिसून येत नसले तरी सर्व बाजूने तपास सुरू आहे अशी माहिती परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली. (Mumbai Crime)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.