Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

87
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज मंगळवार ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी फोनवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला. जवळपास अर्धा तास झालेल्या या चर्चेत ‘आम्ही अर्धवट आरक्षण स्वीकारणार नाही’ असं जरांगे यांनी सांगितलं. तसेच मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणीही जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

पहिल्यांदा शेतीला कुणबी म्हणायचे. आता शेती सुधारित शब्द आलाय. या शब्दाला मराठे कमी लेखणार नाहीत. आम्ही कुणबी प्रमाणपत्र घ्यायला तयार आहोत. यासाठी अभ्यासकांसोबत चर्चा करु असे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले.

कोणी आत्महत्या करु नका. मी देखील लढतोय. मी लढून मरणाला घाबरत नाही. आता सगळीकडे शांततेत आंदोलन सुरु असल्याचे जरांगे म्हणाले. तुम्ही कितीही कारणे दिली तरी आम्ही ऐकणार नाही. हा कायदा पारित करण्यासाठी समितीकडे पुरावे आहेत. हे एका पुराव्यावर होऊ शकतं. तुमच्याकडे भरपूर पुरावे आहेत, असे जरांगेंनी (Manoj Jarange Patil) मुख्यमंत्र्यांना सांगितले.

(हेही वाचा – Manoj Jarange Patil : जाळपाेळ थांबवा अन्यथा… ; मनाेज जरांगे पाटील यांचा आंदोलकांना इशारा)

सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतांना स्पष्टपणे सांगितले की, नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही. आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही, हे त्यांना स्पष्ट सांगितले. आम्ही अभ्यासकांची बैठक बोलावली आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा 2004 चा GR दुरुस्त करा. शेतीच्या आधारावरच आरक्षण दिलेले आहे. कितीही बहाणे सांगितले तरी आम्ही ऐकणार नाहीत. समितीकडे भरपूर पुरावे आहेत. आम्हाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे.

आमचा व्यवसाय शेती आहे. 60 टक्के मराठा आरक्षणात (Manoj Jarange Patil) गेला आहे. आम्ही थोडे राहिलो आहोत. ज्यांना प्रमाणपत्र घ्यायचं आहे ते घेतील. गोरगरीब मराठ्यांची मुलं कुणबी प्रमाणपत्र घेतील, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.