Mumbai Crime : एक प्रेयसी दोन प्रियकर!, ‘ती’ला मिळवण्यासाठी दोघे भररस्त्यात भिडले

दोघे तरुण एकमेकांच्या जीवावर उठले होते, त्यातील एकाने दुसऱ्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळीच स्थानिक फेरीवाल्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे मुळे मोठा अनर्थ टळला.

57
Mumbai Crime : एक प्रेयसी दोन प्रियकर!, 'ती'ला मिळवण्यासाठी दोघे भररस्त्यात आपापसात भिडले
Mumbai Crime : एक प्रेयसी दोन प्रियकर!, 'ती'ला मिळवण्यासाठी दोघे भररस्त्यात आपापसात भिडले

एका तरुणीसाठी दोन तरुण भररस्त्यात आपआपसात भिडल्याचा प्रकार मुलुंड पूर्वेत सोमवारी दुपारी घडला. दोघे तरुण एकमेकांच्या जीवावर उठले होते, त्यातील एकाने दुसऱ्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळीच स्थानिक फेरीवाल्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. नवघर पोलिसांनी या दोन्ही तरुणांची रवानगी कोठडीत केली आहे. मुलुंड पूर्व रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या शिवसेना शाखेसमोर एक तरुणी आणि दोन तरुण एकमेकांशी भांडत होते, त्यातील एकाने या तरुणीला ‘तू कोणावर प्रेम करतेस?’ असा प्रश्न केला. गोंधळलेल्या तरुणीला काय उत्तर द्यावे हे सुचत नव्हते, परंतु उत्तराची प्रतीक्षा न करता दोन्ही तरुणांमध्ये शाब्दिक वादावादी सुरू झाली. दोघांकडून एकमेकांना शिव्यांच्या लाखोल्या वाहण्यात येत होत्या, हा सर्व प्रकार रस्त्याने येणारे जाणारे बघत होते व काही जण तर या भांडणाचा आनंद घेत होते. (Mumbai Crime)

(हेही वाचा – Mumbai Crime : मुलुंड येथील गार्डनच्या शौचालयात जळालेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह )

अचानक भांडणारे हे दोघे तरुण एकमेकांना भिडले आणि भररस्त्यात फ्री स्टाईल हाणामारी सुरू झाली. एका तरुणाने जवळच असलेल्या कलिंगडच्या ठेल्यावर असणारा चाकू घेत दुसऱ्या तरुणावर उगारला, दुसऱ्याने तो वार चुकवत स्वतःचा बचाव करण्यासाठी येथून पळू लागला. तर त्याच्या पाठी चाकू घेऊन हा तरुण धावू लागला, या दोघांच्या पाठी तरुणी आणि तरुणीच्या मागे स्थानिक फेरीवाले धावू लागले. काही अंतरावर फेरीवाल्यांनी तरुणाला पकडून त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेत पोलिसांना कळविले. मुलुंड नवघर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि तिघांना ताब्यात घेऊन नवघर पोलीस ठाण्यात तिघांना आणण्यात आले असून दोन्ही तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. (Mumbai Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.