Online Shopping Fraud : सोशल मीडियावरील फसव्या जाहिराती आणि ग्राहकांची लूट

सायबर गुन्हेगारांनी देखील या संधीचा फायदा घेत सोशल मीडियावर कमी दर आणि आकर्षित करणाऱ्या जाहिराती टाकून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन फसवणूक सुरू केली आहे. या बोगस आणि खोट्या जाहिरातला मोठ्या प्रमाणात लोक बळी पडून स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

551
Online Shopping Fraud : सोशल मीडियावरील फसव्या जाहिराती आणि ग्राहकांची लूट

वेळ आणि पैसे वाचविण्यासाठी अनेक जण ऑनलाईन शॉपिंगकडे (Online Shopping Fraud) वळले आहेत. एका क्लिकवर घरपोच आणि बाजारभावापेक्षा कमी दरात मिळणाऱ्या वस्तूंमुळे ग्राहक मोठ्या संख्येने ऑनलाईन बाजारपेठेकडे वळल्यामुळे हजारोंच्या संख्येने ऑनलाईन शॉपिंगच्या साईड्सनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सायबर गुन्हेगारांनी देखील या संधीचा फायदा घेत सोशल मीडियावर (Online Shopping Fraud) कमी दर आणि आकर्षित करणाऱ्या जाहिराती टाकून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन फसवणूक सुरू केली आहे. या बोगस आणि खोट्या जाहिरातला मोठ्या प्रमाणात लोक बळी पडून स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. (Online Shopping Fraud)

मुंबई पश्चिम उपनगरातील खार येथे राहणारे एक दाम्पत्य या बोगस आणि खोट्या जाहिरातीला (Online Shopping Fraud) बळी पडून त्यांनी जवळपास ७५ हजार रुपये गमावले आहे. अनिल माखिजा यांचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. खार येथे उच्चभ्रू वस्तीत राहणारे माखिजा यांची पत्नी क्रितिका यांनी ‘फेसबुक’ वर ‘फॅशन फंडा’ (fashion-fanda.shop) या नावाची ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping Fraud) दिसून आली, त्याच्यावर स्वस्त आणि आकर्षित कपडे दिसून आले. क्रितिका यांनी फॅशन फंडा या वेबसाईटवर १,२८९ किमतीचा ड्रेस ऑर्डर केला, ‘कॅश अँड डिलिव्हरी’ ऑप्शन असल्यामुळे त्यांनी ते निवडले. (Online Shopping Fraud)

(हेही वाचा – Paytm Crisis : पेटीएममध्ये चीनमधून झालेल्या गुंतवणुकीवर सरकारचं लक्ष)

अशी झाली फसवणूक 

७ फेब्रुवारी रोजी क्रितिका माखिजा यांनी केलेली ऑर्डर दिलेल्या पत्यावर आली, क्रितिका यांनी पार्सल घेऊन रोखीने पैसे दिले. माखिजा यांनी आलेले पार्सल क्रितिका यांनी उघडले असता त्यांना धक्काच बसला क्रितिका यांनी ऑर्डर केलेल्या ड्रेस ऐवजी खराब कपडे आले. त्यांनी तात्काळ फॅशन फंडा साईडवर असलेल्या मेलवर फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान क्रितिका यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन आला व चुकून दुसरे पार्सल आले असल्याचे सांगून तुमचे पैसे गुगल पे वर परत देतो असे सांगून गुगल पे नंबर मागितला. (Online Shopping Fraud)

क्रितिका यांनी पती यांचा गुगल पे क्रमांक देऊन प्ले स्टोर्स मधून कस्टमर सपोर्ट नावचे अँप डाउनलोड करायला सांगून त्यांना त्या अँपमध्ये वेगवेगळे मोबाईल क्रमांक टाइप करायला सांगून माखिजा यांच्या खात्यावरून एकदा ५० हजार दुसऱ्यांदा २४ हजार ४०० रुपये दुसऱ्या खात्यावर वळते केले. बँक खात्यातून पैसे दुसऱ्या खात्यावर जात असल्याचे बघून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. माखिजा दाम्पत्यानी याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बाजारात अनेक शॉपिंग अँप्लिकेशन (Online Shopping Fraud) आलेले आहे, फेसबुक व इन्स्टाग्रामवर ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या जाहिरात करून मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू असून ग्राहकांनी या जाहिरातींना भुलू नये व योग्य ऑनलाईन शॉपिंग अँपवर (Online Shopping Fraud) खरेदी करावी असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. (Online Shopping Fraud)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.